भारत आणि इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत इंग्लंडमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. विराट आणि अनुष्का तिथे खूप एन्जॉय करत आहेत. याच दरम्यानचे फोटो विराटने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खरंतर विराटचे हे सर्व फोटो त्याची पत्नी अनुष्का शर्माने काढले आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या इंग्लंडमध्ये आहेत. त्याचबरोबर जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला ३ आठवड्यांची सुट्टी देण्यात आली होती. त्याच वेळी हे दोघेही इंग्लंडमध्ये फिरताना दिसत होते. (Husband Virat’s photo taken by wife Anushka)
✨ 📸- @AnushkaSharma pic.twitter.com/F1YAW7VFkE
— Virat Kohli (@imVkohli) July 30, 2021
त्यानंतर या दोघांनी मुलगी वामिका ६ महिन्याची झाली, तेव्हा तिचा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला होता. याच दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
भारतीय संघाचा सुट्टीचा कालावधी संपताच इंग्लंडसोबत कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू डरहॅममध्ये सराव करत आहेत. त्याचबरोबर खेळाडूंनी तेथे सराव सामनाही खेळले आहेत. सराव सामन्यानंतर मिळालेल्या ब्रेकदरम्यान भारतीय संघाचे खेळाडू डरहॅममध्ये फिरत आहेत आणि फोटो देखील शेअर केले आहेत.
या कसोटी सामन्याअगोदर भारतीय संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. आता कोहलीला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकून दौरा संपवायचा आहे. सन २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात शेवटच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने भारतीय संघाचा ४-१ ने पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियनच्या ताफ्यात नव्या भारतीय सदस्याची एंट्री, नावावर आहेत ५००पेक्षा जास्त विकेट्स
‘हे’ ३ भारतीय फलंदाज आहेत ‘लंबी रेस का घोडा’! मोडू शकतात सचिनचा मोठा विश्वविक्रम
असे ४ प्रसंग, जेव्हा कसोटी सामन्यात एकाच दिवशी बनल्या होत्या ५०० हून जास्त धावा