---Advertisement---

हैदराबाद एफसीची पुन्हा अव्वल स्थानी झेप; बंगळुरू एफसी घरच्या मैदानावर अपयशी

Hyderabad FC
---Advertisement---

इंडियन सुपर लीग 2022-23(आयएसएल) चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात असलेले बंगळुरू एफसी तोंडावर आपटले. घरच्या मैदानावर बंगळुरू एफसी विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्याच्या प्रयत्नात होते, परंतु गतविजेत्या हैदराबाद एफसीने त्यांना कोणतीच संधी दिली नाही. पहिल्या हाफमध्ये 2-0 अशी आघाडी घेत हैदराबादने यजमानांना बॅकफूटवर फेकले होते. मध्यंतरानंतर यजमान पलटवार करतील, अशी चाहत्यांना आशा होती. पण, हैदराबादने त्यांना सर्व आघाड्यांवर बंगळुरूला मात दिली. हैदराबादने 3-0 असा विजय मिळवून 25 गुणांसह पुन्हा पहिले स्थान पटकावले.

दोन महिन्यांपूर्वी उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात गतविजेत्यांनी बार्थोलोमेव ऑग्बेचेच्या गोलच्या जोरावर बंगळुरू एफसीचा पराभव केला होता. हिरो आयएसएलमध्ये आजच्या लढतीपूर्वी 7 वेळा समोरासमोर आलेल्या उभय संघांत बंगळुरूने केवळ एक विजय मिळवला होता. हैदराबादने 3 सामने जिंकलेले आणि तीन सामने ड्रॉ राहिलेले. ड्युरँड चषक जिंकल्यानंतर बंगळुरू एफसी आयएसएलही गाजवेल असे वाटले होते, परंतु इथे सर्व उलटे घडले. पहिला सामना जिंकल्यानंतर बंगळुरची गाडी घसरली, परंतु आता हिरो आयएसएलच्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरूचे पुनरागमनाचे प्रयत्न आहेत. घरच्या मैदानावर पहिल्या 20 मिनिटांत बंगळुरूने गतविजेत्या हैदराबादवर दडपण राखले, परंतु 26व्या मिनिटाला ऑग्बेचेने हैदराबादला आघाडी मिळवून दिला. ऑग्बेचेने फ्री किकवर हा गोल केला.

हैदराबादकडून सातत्याने आक्रमक खेळ होताना दिसत असल्याने बंगळुरूचे चाहतेही निराश झाले होते. बंगळुरूकडून प्रयत्न झालेच नाही, असं नाही. पण, त्यांच्या प्रयत्नात कुठेतरी उणीवा जाणवत होत्या आणि त्यामुळेच त्यांना गोल करता येत नव्हता. तेच दुसरीकडे ऑग्बेचेने 45व्या मिनिटाला हालिचरण नर्झरीच्या क्रॉसवर आणखी एक गोल करून हैदराबादची आघाडी 2-0 अशी वाढवली, पण हा गोल स्वयंगोल दिला. बचावपटू संदेश झिंगनच्या हेडरमधून हा गोल मिळाला. पहिल्या हाफमध्ये हैदराबादने 2 ऑन टार्गेट प्रयत्न केले अन् दोन्ही यशस्वी राहिले. पण, 0-2 असे पिछाडीवर असलेल्या बंगळुरूने चेंडूवर सर्वाधिक काळा ताबा ठेवला होता आणि त्यांच्याकडून एक ऑन टार्गेट प्रयत्न झाला.

मध्यंतरानंतर हैदराबाद एफसीचे आक्रमण सुरूच राहिले. दुसरीकडे बंगळुरूच्या आक्रमणपटूंमध्ये ताळमेळचा अभाव प्रकर्षाने जाणवला अन् त्याचा फटका त्यांना बसला. खेळाडू बदलले, डावपेमध्येही प्रयोग केले, परंतु बंगळुरूच्या वाट्याला यश काही नाही मिळाले. 87व्या मिनिटापर्यंत बंगळुरूने केवळ एकच शॉट ऑन टार्गेट प्रयत्न केला अन् तोही पहिल्या हाफमध्ये सुनील छेत्रीकडून आला होता. 90व्या मिनिटाला जोएल चिनीजीने अप्रतिम गोल करून हैदराबादची आघाडी 3-0 अशी भक्कम केली अन् तीन गुण निश्चित केले.

निकाल: हैदराबाद एफसी 3 (बार्थोलोमेव ऑग्बेचे 26 मि., संदेश झिंगन 44 मि. (स्वयंगोल), जोएल चिनीजी 90 मि. ) विजयी वि. बंगळुरू एफसी 0

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता रूटही दिसणार आयपीएलच्या रणांगणात! राजस्थानने करोडो मोजत केली स्वप्नपूर्ती
Mumbai Indians Full Squad | कॅमरुन ग्रीनवर 17.50 कोटी खर्च केल्यामुळे नाही पुरले पैसे, ‘असा’ आहे संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---