चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दिपक चाहर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्यासह चेन्नईच्या १३ सदस्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह होता. पण आता त्या सर्वांचा सोमवारी कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. याचदरम्यान दीपकने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने सांगितले आहे की तो बरा झाला आहे.
या व्हिडिओमध्ये दीपक रुममध्येच वर्कआऊट करतानाही दिसत आहे. तसेच त्याने या कठिण काळात चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद म्हटले आहे. या व्हिडिओला त्याने कॅप्शन दिले आहे की ‘तूम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनेबद्दल धन्यवाद. मी आता ठिक आहे आणि मी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आशा आहे की तूम्ही मला लवकरच मैदानात पहाल. तूम्ही असेच प्रेम देत रहा.’
चेन्नई सुपर किंग्सनेही त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://twitter.com/deepak_chahar9/status/1300806633480769536
दीपक सीएसकेच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्यासह अन्य सीएसके सदस्यांचा कोरोना अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला असला तरी त्यांची ३ सप्टेंबरला पुन्हा चाचणी होणार आहे. तसेच तसेच अहवाल निगेटिव्ह आला असला तरी चाहर त्याचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करेल आणि १२ सप्टेंबरनंतरच मैदानावर सरावाला सुरुवात करु शकेल.
चाहरने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ३४ सामने खेळले असून ३३ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर संकटांनी वेढलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी आली आनंदाची बातमी
हा भारतीय क्रिकेटर म्हणतोय, त्याच्यात आहे भविष्यवाणी करण्याची क्षमता
धोनी क्रिकेटमध्ये एका योग्यासारखा, या भारतीय दिग्गजाने व्यक्त केले मत
ट्रेंडिंग लेख –
जर ही गोष्ट घडली नसती तर अँडरसनच्या आधीच ‘या’ ३ वेगवान गोलंदाजांनी घेतल्या असत्या कसोटीत ६०० विकेट्स
एक नाही दोन नाही आख्खा संघच ठरला होता मॅन ऑफ द मॅच, पण कसे ते घ्या जाणून