---Advertisement---

भारतीय संघातील या खेळाडूमुळेच केदार खेळू शकला एवढे वनडे सामने

On: शनिवार, एप्रिल 18, 2020 11:11 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा फलंदाज केदार जाधवने गुरुवारी (१६ एप्रिल) एमएस धोनीच्या पाठिंब्यामुळे त्याला अनेक आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळता आल्याचे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी जाधवची भारतीय संघात निवड करण्यात आली होती.

परंतु ही मालिका कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली होती.

चेन्नई सुपर किंग्सबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान बोलताना ३५ वर्षीय जाधव म्हणाला की, “जेव्हा मी मोठा होत होतो, त्यावेळी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) माझा आदर्श होता. मला याचा पश्चाताप होतोय की, मला त्याच्याबरोबर खेळता आले नाही. परंतु जेव्हा आवडत्या खेळाडूबद्दल विचाराल तर, माझा आवडता खेळाडू नेहमीच धोनी (MS Dhoni) असणार आहे.”

जाधव (Kedar Jadhav) पुढे म्हणाला की, “जेव्हा मी धोनीला भेटलो होतो, तेव्हा मला असे वाटत होते की तो भारताचा कर्णधार असल्यामुळे खूप कठोर असेल. परंतु त्याची भेट घेतल्यानंतर तो माझा आवडता खेळाडू बनला.”

आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून खेळणारा जाधव म्हणाला की, “मला ८-१० वनडे सामनेच खेळता आले असते. परंतु माही भाईने मला पाठिंबा दिला. त्यामुळे मी अधिक सामने खेळलो. त्याच्या शांत स्वभावाचा माझ्यावर प्रभाव पडला आहे. जेव्हा मी त्याला पाहतो, तेव्हा माझा आत्मविश्वास वाढतो. जर तुम्हाला असाच पाठिंबा कर्णधाराकडून मिळाला तर त्याचा खूप फायदा होतो.”

जाधवने आतापर्यंत ७३ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४२.०९ च्या सरासरीने एकूण १३८९ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त त्याने ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २०.३३ च्या सरासरीने १२२ धावा केल्या आहेत. यामध्ये केवळ १ अर्धशतकाचा समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-भारतात वनडेत अतिशय खराब कामगिरी केलेले ५ दिग्गज क्रिकेटर्स

-हा देश म्हणतो, आमच्याकडे आयपीएल घ्या, काही चिंता करु नका

-भारतात कसोटीत सुप्पर डुप्पर फ्लाॅप ठरलेले ५ महान क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---