---Advertisement---

“वाटत नाही की भुवनेश्वरला भविष्यात भारतीय संघात संधी मिळेल”, माजी क्रिकेटरकडून शंका उपस्थित

On: मंगळवार, जानेवारी 25, 2022 3:52 PM
Bhuvneshwar Kumar
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नुकतेच जाऊन आलेल्या भारतीय संघाने कसोटीसोबतच एकदिवसीय मालिकासुद्धा गमावली आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार याची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. तो संघासाठी चांगली गोलंदाजी करु शकला नाही. यामागचं कारण म्हणजे शेवटच्या एकदिवसीय मालिकेत राहुल द्रविड आणि केएल राहुल यांच्या नेतृत्वाखाली संघ व्यवस्थापनाने त्याला बाहेरचा रस्ता देखील दाखवला. आता माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राचे मत असे आहे की, भुवनेश्‍वर कुमारला भविष्यात भारतीय संघात स्थान मिळणे खूप कठीण आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आकाश चोप्रा म्हणाला की, “मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक आहे. या प्रकारामध्ये भारतीय गोलंदाजांना धावासुद्धा रोखता येत नाहीत आणि विकेट सुद्धा घेता येत नाहीत. दिपक चाहरने या सामन्यात चांगली गोलंदाजी किंवा फलंदाजी केली म्हणून मी म्हणत नाही. भुवनेश्वर कुमार काळासोबत चालला नाही. दीपक चाहर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १६ ते २० महिन्यांपासून भुवनेश्वर चमकदार कामगिरी करताना दिसला नाही.”

अधिक माहिती – भुवीच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका आणि विकेट्स यांच जरा वाकडंच! दुसऱ्या वनडेत नकोसा विश्वविक्रम नावावर

तो पुढे म्हणाला की, “दीपक चाहरला संधी मिळाली आणि त्याने काही विकेट घेतल्या ही चांगली गोष्ट आहे. त्याने अद्याप डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केलेली नाही. त्याला दीर्घकाळ, वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढील काळात भुवनेश्वर कुमारला एकदिवसीय आणि टी २० मध्ये संधी दिली जाईल, असे मला वाटत नाही.”

व्हिडिओ पाहा – नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता? 

भुवनेश्वर कुमारने मागील दोन वर्षांमध्ये ७ एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त ९ विकेट्स घेतल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये देखील त्याचे पुनरागमन देखील चांगले दिसले नाही. २०१९ च्या सुरुवातीपासून त्याने २१ टी२० सामन्यांमध्ये प्रतिषटक ७ पेक्षा जास्त धावांच्या इकॉनॉमी रेटने फक्त २० विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वर अलीकडच्या काळात अनेकदा जखमी झाला असून त्याचा फॉर्मही चिंतेचा विषय ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आपण फेकलेल्या गुगलीतच फसली राजस्थान रॉयल्सची टीम, नव्या लखनऊ संघाने अशी जिरवली मस्ती

नामकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लखनऊ संघाला मोठा धक्का! संघातील प्रमुख सदस्याला कोरोनाची लागण

शेवटच्या षटकात ३ षटकार अन् २ चौकारांनंतरही वेस्ट इंडिजचा १ धावेने पराभव, वाचा रोमांचक सामन्याबद्दल सविस्तर

नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता? । Sehwag and John Wright Controversy

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---