---Advertisement---

धोनीच्या काळात खेळलो असलो तरी मी अनलकी नाही – पार्थिव पटेल

---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने डिसेंबर २००४ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नंतर त्याने भारताच्या नेतृत्वाचीही धूरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीचे ३ महत्त्वाचे विजेतीपदे मिळवली आहे.

तसेच धोनीने त्याच्या कारकिर्दीत काही अविश्वसणीय खेळी देखील केल्या आहेत. धोनीने एक चांगला फलंदाज तसेच कर्णधार म्हणून नाव कमावण्याबरोबर एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणूनही ओळख मिळवली आहे. त्याच्या चपळ यष्टीरक्षणाचे नेहमीच कौतुक होते. तो भारताचा यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारा यष्टीरक्षक आहे.

त्यामुळे गेल्या १५ वर्षात भारतीय संघात धोनीच्या रुपात एक चांगला यष्टीरक्षक फलंदाज असल्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अन्य यष्टीरक्षक फलंदाजांना मोठी संधी मिळाली नाही. यामध्ये गुजराजचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलचाही समावेश आहे. पण याबद्दल स्वत:ला दुर्दैवी समजत नसल्याचे पार्थिवने म्हटले आहे.

फीव्हर नेटवर्कच्या १०० अवर्स १०० स्टार्स या व्हिडिओ अभियानादरम्यान बोलताना पार्थिव म्हणाला, ‘मी धोनीच्या काळात खेळलो असल्याने स्वत:ला दुर्दैवी मानत नाही. माझी कारकिर्द त्याच्याआधी सुरु झाली होती. मला त्याच्याआधी चांगली कामगिरी करण्याची संधी होती.’

‘धोनी संघात आला कारण मी काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी करु शकलो नाही आणि मला वगळण्यात आले. मला माहित आहे की लोक सहानुभूती दाखवण्यासाठी असे म्हणू शकतात की मी एका चूकीच्या काळात जन्माला आलो. पण माझा यावर विश्वास नाही.’

पार्थिवने धोनीच्या आधी २००२ लाच भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. मात्र काही सामन्यांनंतर त्याला वगळण्यात आले. पुढे धोनी भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज झाल्याने अन्य यष्टीरक्षकांना स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.

२०१६ च्या रणजी ट्रॉफी विजेत्या गुजरात संघाचा कर्णधार असलेला पार्थिव पुढे म्हणाला, ‘धोनीने जे काही मिळवले आहे ते खरंच खूप खास आहे आणि त्याने ते मिळवले कारण त्याने त्याला मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. त्यामुळे मला दुर्दैवी असल्याचे वाटत नाही.’

पार्थिवने आत्तापर्यंत २५ कसोटी सामने, ३८ वनडे आणि २ टी२० सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले आहेत. यात त्याने मिळून १७०६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ५३ सामन्यांमध्ये पार्थिवने भारताचे यष्टीरक्षण करताना ११२ विकेट्स घेतल्या आहेत.

तो भारताकडून शेवटचा कसोटी सामना २०१८ ला खेळला. तर शेवटचा वनडे सामना २०१२ ला खेळला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

धोनीची ती रिऍक्शन पाहून भारताचा वेगवान गोलंदाज जाम घाबरला होता

रोहित-विराट नाही तर ‘या’ क्रिकेटपटूने मारले आहेत टी२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार

वय केवळ २६ वर्षेे; किडनी, लिव्हर झालेत फेल आता कोरोना पॉझिटिव्हही आढळला हा क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---