---Advertisement---

“मला वाटत नाही धोनी पुन्हा भारताकडून खेळेल”

On: शुक्रवार, जानेवारी 17, 2020 4:13 PM
---Advertisement---

गुरुवारी(16 जानेवारी) बीसीसीआयने ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी वरिष्ठ भारतीय पुरुष क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. या यादीतून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला वगळण्यात आले आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा धोनीच्या भविष्याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

हरभजन पीटीआयशी बोलताना म्हणाला, ‘मला वाटत नाही की धोनी परत भारताकडून खेळेल. कारण त्याने 2019 विश्वचषकापर्यंतच खेळण्याचा निर्णय घेतला होता. तो कदाचित आयपीएलसाठी तयारी करत असेल.’

नुकत्याच आलेल्या काही रिपोर्ट्स नुसार धोनीने झारखंड रणजी संघासह सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता धोनीच्या भविष्याबाबतच्या चर्चेला आणखी उधान आले आहे. मात्र धोनीने त्याच्या भविष्याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.

तो मागीलवर्षी जूलैमध्ये 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध शेवटचे खेळला आहे. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे.

त्याचा मागीलवर्षी बीसीसीआयच्या वार्षिक मानधन करारात अ श्रेणीत समावेश होता. पण त्याला यावेळी मात्र वगळण्यात आले आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1218104821867139072

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---