स्वीडनचा माजी फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचला त्याच्या सुरूवातीच्या कारकिर्दीत मॅंचेस्टर युनायटेड कडून न खेळण्याचा पश्चाताप होत आहे.
स्वीडनच्या फुटबॉल इतिहासात आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल करण्यात इब्राहिमोविच पहिल्या स्थानावर आहे. त्याने 116 सामन्यात 62 गोल केले आहेत.
2016च्या युरो चषकात स्वीडन साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. यावेळी इब्राहिमोविच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहिर केली.
इब्राहिमोविच 2016-18 या दोन वर्षात युनायटेडकडून खेळत होता. या दरम्यान त्याने 53 सामन्यात 29 गोल करताना त्याने त्याच्या पहिल्या वर्षातच इंग्लिश फुटबॉल लीग चषक तसेच युरोप लीग जिंकली.
2016-17च्या दम्यान बर्नली विरुद्धच्या सामन्यात खेळताना गुडघ्याची दुखापत झाली होती. मार्चमध्ये अमेरिकेला जाण्यापूर्वी संघाला त्याला नीट अलविदाही करता आले नाही.
“चाहत्याबद्दल मला दु:ख वाटत आहे. जर मी युनायटेडकडून तरूण वयातच खेळलो असतो तर चाहत्यांना माझ्यात एक अनोखा खेळाडू दिसला असता”, असे इब्राहिमोविचने मॅंचेस्टर युनायटेडच्या अधिकृत वेबसाईटला सांगितले.
“जेव्हा मी सगळीकडे बघतो तेव्हा मला लाल हाच रंग दिसतो. चाहत्यांना माझ्या भावना सांगण्यासाठी मला अधिक वेळ हवा आहे. तरीही सगळ्यांचे खुप धन्यवाद”, असेही इब्राहिमोविच म्हणाला.
अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर सॉकर लीगमध्ये एल ए गॅलक्सीकडून खेळताना इब्राहिमोविचने 15 सामन्यात 12 गोल केले आहेत. तसेच उद्या एल ए गॅलक्सीचा लॉस एजेंल्स फुटबॉल क्लबशी सामना आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडूंच्या नामांकनात फक्त एकच डिफेंडर
–ला लीगा नव्या हंगामातील रियल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना सामन्यांच्या तारखा जाहीर