---Advertisement---

युवराजच्या षटकारांच्या हॅट्रिकनंतर चहलला आठवला स्टुअर्ट ब्रॉड, पहा काय म्हणाला…

---Advertisement---

गुरुवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्यात मुंबईकडून अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने बेंगलोरचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार मारले.

त्यामुळे चहलला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची आठवण झाली आहे. 2007 च्या टी20 विश्वचषकात 19 सप्टेंबरला इंग्लंड विरुद्ध डर्बनमध्ये ब्रॉडने टाकलेल्या गोलंदाजीवर युवराजने सहा चेंडूत सलग सहा षटकार मारले होते.

त्याप्रमाणे मंगळवारी झालेल्या सामन्यात युवराजने 14 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर तीन चेंडूत सलग तीन षटकार मारले. पहिला षटकार त्याने डिप स्क्वेअरला मारला, दुसरा षटकार चहलच्या डोक्याच्यावरुन मारला तर, तिसरा षटकार लाँग ऑनवर मारला.

मात्र चौथ्या चेंडूवर युवराजला बाद करण्यात चहलला यश आले. युवराजचा झेल मोहम्मद सिराजने घेतला. यावेळी युवराजने 12 चेंडूत 23 धावा केल्या.

युवराजच्या या खेळीबद्दल चहल सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला, ‘जेव्हा त्याने तीन षटकार मारले मला स्टुअर्ट ब्रॉड सारखेच वाटले.’

पुढे चहल म्हणाला, ‘तूम्हाला माहित आहे तो दिग्गज फलंदाज आहे. पण मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला. मी चेंडूला थोडी उंची दिली. यामुळे त्याला येथील छोट्या मैदानावर बाद करण्याची संधी मिळू शकते. त्यावेळी मी माझा सर्वोत्तम चेंडू टाकण्याचा विचार करत होतो आणि तो षटकार मारत होता. त्यामुळे मी वाईड गुगली टाकली.’

गुरुवारी झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 187 धावा करत बेंगलोरसमोर 188 धावांचे आव्हान ठेवले होते. पण बेंगलोरला 20 षटकात 5 बाद 181 धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरला 6 धावांनी पराभूत व्हावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटच्या नाराजीनंतरही अंपायरवर कारवाईची शक्यता धूसर, जाणून घ्या कारण

‘आम्ही आयपीएल खेळतो, क्लब क्रिकेट नाही’, अंपायरवर भडकला विराट कोहली

सामना पराभूत झाला असला तरी कोहली, डिविलियर्सने केले हे मोठे पराक्रम

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment