आधुनिक क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आहेत, जे आपल्या विस्फोटक फलंदाजीने जगातील कुठल्याही गोलंदाजांवर हल्लाबोल करू शकतात. यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीसह एबी डिविलियर्स, ओएन मॉर्गन, जोस बटलर यांचा समावेश होतो. प्रत्येक गोलंदाजाला वाटते की, त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकदा तरी या फलंदाजांना बाद करावे. अशातच पाकिस्तान संघाच्या फिरकी गोलंदाज उस्मान कादिर याने या दिग्गज फलंदाजांना बाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पाकिस्तान संघाचा २७ वर्षीय फिरकी गोलंदाज उस्मान कादिर याने झिम्बाब्वे संघाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता त्याने जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांना बाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
त्याने ‘क्रिकेट पाकिस्तानला’ दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अनेक मोठे क्रिकेटपटू आहेत. यामध्ये ओएन मॉर्गन, जोस बटलर, विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांचा समावेश आहे. जर तुम्हाला या फलंदाजांपैकी एकही फलंदाजाला बाद करण्यात यश आले तर, तुम्हाला धैर्य आणि प्रोत्साहन मिळेल. माझी अशी इच्छा आहे की, मी या सर्व फलंदाजांना बाद करावे.”
उस्मान कादिर हा पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत मुलतान सुलतान संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याला आगामी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने संघात निवड होताच कर्णधार बाबर आजम, प्रशिक्षक मिस्बाह उल हक आणि वकार युनूस यांचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले की, “अशा लोकांसोबत राहून तुमच्या आत्मविश्वासात वाढ होत असते.”
कादिरने आतापर्यंत एकूण ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने ७.२१ च्या इकॉनॉमिने १८ गडी बाद केले आहेत. यासोबतच एकमात्र वनडे सामन्यात त्याला १ गडी बाद करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा सैरसपाटा वा अजून काही! कसोटी चॅम्पियनशीप फायनलनंतर विराटसेनेला मिळणार ‘मोठी’ सूट
आयपीएलची पहिलीवहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आता करतो तरी काय? घ्या जाणून
टी१० क्रिकेटमध्ये फलंदाजाचा कहर विक्रम, अवघ्या २८ चेंडूत झळकावले तूफानी शतक