---Advertisement---

इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होण्यास दिला नकार; म्हणाला….

On: रविवार, फेब्रुवारी 6, 2022 12:40 AM
ENGLAND-TEST-TEAM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ऍशेस मालिकेतील पराभवानंतर आणि मागील ४ मालिकांतील खराब कामगिरीनंतर नुकतेच इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड (Chris Silverwood) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता संघाचे नवे प्रशिक्षक कोण असणार? यावर चर्चा सुरु आहेत. यातच इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने केलेल्या ट्विटमुळे इंग्लंड क्रिकेटमधील वातावरण चांगलच तापले आहे. त्याने इंग्लंड संघाचा प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे त्याबरोबरच एक अट पुढे ठेवली आहे.

ट्विटवर केविन पीटरसन याला संघाचा प्रशिक्षक बनण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने नाही असे उत्तर दिले. परंतु त्याने नंतर एक महत्त्वाची अट पुढे ठेवत इंग्लंड संघाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संघाच्या प्रशिक्षकपदाची अट सांगताना त्याने म्हटले आहे की, “जे मला वारंवार विचारत आहेत त्यांना सांगतो की ते जोपर्यंत काउंटी क्रिकेटला फ्रेंचायझी देण्यास प्रतिबद्ध होत नाहीत तोपर्यंत मी इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेणार नाही. जर ते तसे करत नसतील आणि काउंटी क्रिकेटपटू अजूनही व्यावसायिक राहिले तर कृपया वेगळ्या परिणामांची अपेक्षा करू नका”. केविन पीटरसनला फ्रँचायझी प्रणाली अंतर्गत काउंटी क्रिकेट पुनरुज्जीत करायचे आहे. ज्यामुळे तो सर्वोत्तम खेळाडू तयार करू शकेल.

ऍशेस मालिकेतील पराभवानंतर इंग्लंडमध्ये प्रशिक्षकांचे राजीनामे सुरूच आहे. व्यवस्थापकीय संचालकांच्या राजीनाम्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनीही संघ सोडला आणि प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांनीही राजीनामा दिला आहे.

ऍशेस मालिकेतील पाच सामन्यांत इंग्लंड संघ एकही सामना जिंकू शकला नाही. संपूर्ण मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. कर्णधार जो रूट सुद्धा धावा करण्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. गोलंदाजांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंड संघाने ऍशेस मालिका ०-४ ने गमावली. ऍशेस मालिकेतील पराभवानंतर कर्णधार जो रूट खूपच निराश दिसत होता.

केविन पीटरसनने २००४ ते २०१४ पर्यंत इंग्लंडसाठी एकूण १०४ कसोटी सामने, १३६ एकदिवसीय सामने आणि ३७ टी२० सामने खेळले आणि या सामन्यांत त्याने अनेक धावा केल्या. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ८१८१ धावा केल्या, तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४४४० धावा आणि टी२० मध्ये ११७६ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---