श्रीलंका क्रिकेट सध्या अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेला क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमधील वाद सुटू शकला नाही. तर दुसरीकडे संघाची मैदानावरील कामगिरी कमालीची घसरली आहे. त्यातच, इंग्लंडमध्ये खेळाडूंनी गैरवर्तन केल्याने श्रीलंका क्रिकेटची बदनामी झाली. इंग्लंडमध्ये बायो-बबल तोडणाऱ्या खेळाडूंविषयी श्रीलंका संघाचे विश्वविजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
खेळाडूंनी तोडला बायो-बबल
श्रीलंका क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी२० मालिकेत पराभूत झाल्यानंतर सध्या उभय संघांमध्ये वनडे मालिका सुरू असून, पहिल्या दोन सामन्यात श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला आहे. यादरम्यान संघाचे प्रमुख फलंदाज धनुष्का गुणतिलिका, कुसल मेंडीस व यष्टीरक्षक निरोशन डिकवेला हे बायो–बबल तोडून बाहेर फिरताना आढळून आले. तसेच, निरोशन व मेंडीस यांचा धूम्रपान करतानाचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. ही घटना समोर आल्यानंतर श्रीलंका संघ व्यवस्थापनाने या तिन्ही खेळाडूंवर कारवाई करत त्यांना मायदेशी पाठवून दिले. तसेच त्यांना वर्षभरासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले.
मी त्यांच्या कानशिलात लगावली असती
या गंभीर प्रकरणामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाची नाचक्की झाल्यानंतर श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी या खेळाडूंना सोशल मीडिया वापरण्यास बंदी केली असती. खेळाडू क्रिकेट सोडून फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरत असतात. बोर्ड प्रशासन याबाबत काही विचार करत नाही. या खेळाडूंना केवळ प्रसिद्धी हवी आहे. मी त्याठिकाणी असतो तर, आतापर्यंत यांना २-३ वेळा कानशिलात लगावली असती.”
अर्जुन रणतुंगा हे सातत्याने श्रीलंका क्रिकेट बोर्ड व खेळाडूंवर खराब कामगिरीनंतर सडेतोड टीका करताना दिसून येतात. त्यांच्याच नेतृत्वात श्रीलंकेने १९९६ क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.
मैदानावर फ्लॉप ठरत आहे श्रीलंका संघ
काही वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दादा संघांपैकी एक असणाऱ्या श्रीलंका संघाची सध्या पूर्णपणे वाताहात झाली आहे. संघ आता इंग्लंड दौऱ्यावर असून, इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत त्यांना क्लीन स्वीप दिला. तसेच, वनडे मालिकेत देखील ते २-० असे पिछाडीवर आहेत. सोबतच, क्रिकेट बोर्ड व खेळाडू यांच्यात नव्या करारामुळे वाद सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–पाकिस्तानच्या टॉपच्या ४ खेळाडूंच्या एकूण पगारापेक्षाही रोहित शर्माचा पगार आहे दुप्पट, पाहा किती मिळतंय मानधन
–काय सांगता! युझवेंद्र चहलच्या पत्नीच्या हातावर गोंदलेले आहे तिच्या ‘एक्स बॉयफ्रेंड’चे नाव