आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये आर अश्विनला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्याऐवजी रवींद्र जडेजाला प्राधान्य देण्यात आले आहे. इंग्लंडचा माजी कर्णदार मायकेल वॉन याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र यावेळी त्याने अश्विनच्या समर्थनार्थ नव्हे विरोधाभासी वक्तव्य केले आहे. सध्या लॉर्ड्स कसोटी जिंकल्यानंतर भारत मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.
क्रिकबझ वेबसाईटशी बोलताना मायकेल वॉन म्हणाला की, “असे दिसते आहे की, हा आठवडा प्रचंड चांगला गेला आहे. वातावरण कोरडे आणि उष्णता असलेले राहिले आहे. त्यामुळे अश्विन या आठवड्यात खेळला नाही तर मला ते आवडेल.”
“मला असे वाटते की, भारत तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार आहे. हेडिंग्लेसाठी हा योग्य निर्णय असेल. आपल्या तीन सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांना खेळू द्या. जरी ईशांतने लॉर्ड्स कसोटीच्या शेवटच्या दिवशी त्याने चमकदार गोलंदाजी केली असली तरीही; मला असे वाटते की, ईशांतला जागा मिळू शकणार नाही. गेल्या काही वर्षांत हेडिंग्ले येथील संघाचे प्रदर्शन पाहून हे सांगता येऊ शकते की तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी फिरकीपटूंना येथे मदत मिळते.”
अश्विनला बसावे लागू शकते बाकावर
२५ ऑगस्टपासून हेडिंग्ले येथे तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार आभासी पत्रकार परिषदेद्वारे पत्रकारांना सामोरे गेला. यावेळी त्याने भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू अश्विन हा या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत माहिती दिली.
तो म्हणाला, “अश्विन खेळणार की नाही याबाबत निर्णय सामन्याच्या आधी होईल.” विराटने बोलता-बोलता अप्रत्यक्षरीत्या अश्विन या सामन्यात खेळणार नसल्याचे संकेत दिले. विराट म्हणाला, “आम्हाला संघात बदल करायचे काही कारण वाटत नाही. सर्व खेळाडूंनी दोन्ही सामन्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.”
भारत तिसऱ्या सामन्यातही चार वेगवान गोलंदाज व फिरकी गोलंदाज म्हणून अष्टपैलू रवींद्र जडेजासह मैदानात उतरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्सवरील शतकी भागिदारी दरम्यान रहाणे-पुजारामध्ये काय झाले होते बोलणे? उपकर्णधाराने केला खुलासा
अजबच! धोनीने मारले लांबच लांब शॉट्स आणि मग स्वत:च संघसहकाऱ्यांसह गेला झुडपात चेंडू शोधायला