भारतीय क्रिकेटमध्ये सध्या रोहित युगाचा प्रारंभ झाला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे कसोटी संघाचे नेतृत्त्वपदही देण्यात आले आहे. त्याने कसोटी कर्णधार (Test Captain) म्हणून त्याच्या पहिल्याच सामन्यात चांगली नेतृत्त्व कामगिरीही केली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील मोहाली (Mohali Test) येथे झालेल्या सामन्यात रोहितने अचूक क्षेत्ररक्षण लावले आणि गोलंदाजी बदल करण्यासारखे योग्य निर्णय घेत १ डाव २२२ धावांनी सामना जिंकला. यानंतर माजी भारतीय कसोटी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रोहितच्या नेतृत्त्वाची प्रशंसा करताना त्याला नेतृत्त्वाला १० पैकी (Points Out Of 10) गुणही दिले आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान रोहितने नेतृत्त्व करताना काही मजबूत निर्णय घेत भारतीय संघाचे पारडे जड केले. यामध्ये दुसऱ्या डावादरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला थांबवणे आणि जयंत यादवला गोलंदाजीची संधी देणे. तसेच फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळत असल्यामुळे रविंद्र जडेजा आणि आर अश्विनचा अधिकाधिक वापर करून घेणे, दुसऱ्याच दिवशी ५७४ धावांवर डाव घोषित करणे, अशा बऱ्याचशा निर्णयांचा समावेश आहे.
हेही वाचा- टीम इंडियात पुनरागमन करणार हार्दिक? एनसीएमध्ये दाखल होण्याचे मिळाले आदेश
रोहितच्या नेतृत्त्वाबद्दल स्टार स्पोर्टवर बोलताना गावसकर (Sunil Gavaskar On Rohit Sharma Captaincy) म्हणाले की, “कसोटी कर्णधाराच्या रूपात रोहितची सुरुवात शानदार राहिली. तुम्ही ३ दिवसांच्या आतच कसोटी सामना जिंकत असाल तर ही गोष्ट तुमचा संघ किती तगडा आहे, ही गोष्ट दर्शवते. त्यापेक्षाही जास्त महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की, जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा गोलंदाजीत रोहितने केलेले बदल खूप प्रभावशाली होते. श्रीलंकन फलंदाजांचे झेल बरोबर त्याच जागी जात होते, जिथे क्षेत्ररक्षक उभा होता.”
पुढे रोहितच्या नेतृत्त्वाला गुण देताना गावसकर म्हणाले की, “मी कर्णधार रोहित शर्माला त्याच्या नेतृत्वासाठी १० पैकी ९.५ गुण देऊ इच्छितो.”
विराटनंतर रोहितने सांभाळली कसोटी संघाची सूत्रे
भारतीय संघ २०२२ च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर विराट कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदावरून पायउतार झाला होता. त्यामुळे विराटनंतर संघ निवडकर्त्यांनी रोहितला कसोटीचा कर्णधार म्हणून घोषित केले. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेतून भारताच्या कसोटी संघाची कमान हाती घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गुजरात टायटन्सला मिळाला जेसन रॉयचा रिप्लेसमेंट, टी२० क्रिकेटमध्ये वेगाने धावा बनवण्यात आहे माहिर
दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडली आश्चर्यकारक घटना; वाचा सविस्तर
महाराष्ट्र राज्य ८ वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटात निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन