आपल्या जबरदस्त फटकेबाजीने कोलकाता नाईट रायडर्सच्या हातातील सामना हिसकावत रोवमन पॉवेलने गुरुवारी (२८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला. या सामन्याचा निकाल कोलकाताच्या बाजूने होता. मात्र, अखेरच्या षटकात दिल्लीकडून फलंदाजी करणाऱ्या पॉवेलने सामना दिल्लीच्या बाजूने वळवला. पॉवेलच्या या शानदार फटकेबाजीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशात वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप यांनी पॉवेलची मन जिंकणारी कहाणी सांगितली आहे. त्यांनी पॉवेलची आठवण सांगितली की, तो जेव्हा शाळेत शिकत होता, तेव्हा त्याने त्याच्या आईशी गरिबी नष्ट करण्याचे वचन दिले होते.
आयपीएल २०२२च्या ४१व्या सामन्यात कोलकाताविरुद्ध (Kolkata Knight Riders) खेळताना दिल्लीच्या रोवमन पॉवेलने (Rovman Powell) १६ चेंडूत नाबाद ३३ धावा चोपल्या. त्याने या धावा करताना १ चौकार आणि ३ षटकार लगावले. यावेळी बिशप पॉवेलची प्रशंसा करताना म्हणाले की, अनेकांना त्याला यशस्वी होताना पाहायचं आहे. कारण, त्यांना पॉवेलच्या संघर्षाची कहाणी माहिती आहे.
Powell finishing the game for us. Things we love to see 🫶🏼#YehHaiNayiDilli | #IPL2022#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | #DCvKKR | @Ravipowell26 pic.twitter.com/v6UgXncdYT
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022
इयान बिशप (Ian Bishop) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “जर कोणाकडे १० मिनिटांचा वेळ असेल, तर जाऊन रोवमन पॉवेलच्या आयुष्याची कहाणी पाहा, याचा संपूर्ण व्हिडिओ युट्यूबवर आहे. तुम्ही पाहाल की, पॉवेलने आयपीएलमध्ये यशाची चव चाखली आहे. त्यामुळे माझ्यासह इतके सारे लोक का खुश आहेत. तो गरीब कुटुंबातून आला आहे. जेव्हा तो माध्यमिक विद्यालयात शिकत होता की, तेव्हा त्याने आपल्या आईला वचन दिले होते की, तो कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढेल. त्याने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. शानदार कहाणी.”
जमैकामध्ये ओल्ड हार्बरच्या बॅनिस्टर जिल्ह्यात जन्मलेल्या पॉवेलने आपल्या आई आणि लहान बहिणीसोबतच खूपच कठीण परिस्थितीचा सामना केला. कॅरिबियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये एक डॉक्युमेंट्री बनली, ज्यामध्ये पॉवेलच्या गरिबीतून यशापर्यंतची भावूक कहाणी दाखवली गेली आहे.
पॉवेलच्या फलंदाजीबद्दल बोलताना बिशप म्हणाले की, “तो एक चांगला खेळाडू आहे. मी कॅरिबियामध्ये आदिल राशिद आणि मोईन अली यांच्याविरुद्ध झळकावलेले पॉवेलच्या शतकाबद्दल विचार करत होतो. मागील फेब्रुवारीमध्ये भारतात या फिरकीपटूंव्यतिरिक्त त्याची सरासरी ४३ इतकी होती. त्याने खूप सुधारणा केली आहे. तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगली फलंदाजी करतो.”
पॉवेलची आयपीएल कारकीर्द
पॉवेलच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याचा हा पहिलाच आयपीएल हंगाम आहे. पॉवेलने आयपीएल २०२२मध्ये ८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १६.५७च्या सरासरीने १०० धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चार विकेट्स घेऊनही पंतने कुलदीपला का दिले नाही त्याच्या हक्काचे चौथे षटक? स्वत:च सांगितले कारण