मुबंई I वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक इयान बिशप यांनी या दशकातील जागतिक वनडे संघ निवडला आहे. या ११ खेळाडूंपैकी ३ भारतीय खेळाडूंचा संघात समावेश आहे. विशेष म्हणजे या संघाच्या नेतृत्वाची धुरा त्यांनी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्याकडे सोपविली आहे.
बिशप (Ian Bishop) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि धोनी यांना संघात स्थान दिले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या जागतिक एकदिवसीय संघात एकाही भारतीय गोलंदाजाला स्थान दिले नाही. सलामीची जबाबदारी त्यांनी रोहित आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्यावर सोपविली आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी भारतीय कर्णधार विराटला स्थान दिले आहे. चौथ्या क्रमाकांसाठी ३६० या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) याला निवडले आहे.
विशेष बाब म्हणजे बिशप यांनी स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि केन विलियमन्स (Kane Williamson) यांना संघात स्थान दिले नाही. पाचव्या स्थानासाठी कीवी फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) आणि अष्टपैलू म्हणून बांगलादेशचा दिग्गज खेळाडू शाकिब अल हसन (Shakib al hasan) याला निवडले आहे. धोनीवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली आहे.
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क (Mitchell Starc), दक्षिण आफ्रिका डेल स्टेन (Dale Steyn), श्रीलंकेचा लसिथ मलिंगा यांच्यावर सोपविली आहे. फिरकी गोलंदाज म्हणून अफगाणिस्तानचा युवा खेळाडू फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याला संघात स्थान दिले आहे. बिशप यांनी निवडलेल्या संघात एकही पाकिस्तानी खेळाडू नाही.
इयान बिशप यांनी निवडलेला दशकातील वनडे संघ- Ian Bishop’s ODI XI Of The Decade
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिविलियर्स, रॉस टेलर, शाकिब अल हसन, एमएस धोनी (कर्णधार), मिशेल स्टार्क, डेल स्टेन, लसिथ मलिंगा, राशिद खान
ट्रेंडिंग घडामोडी-
-असा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, होणार ४ कसोटी सामने?
-आयपीएलमध्ये एकही षटकार न मारु शकलेले ३ फलंदाज
-यावर्षीच्या विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल ‘तीन’ अतिशय महत्त्वाचे पर्याय