काही दिवसांपूर्वी टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू पदक मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसले होते. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. या स्पर्धेत तुम्हाला असामान्य क्षमता असलेले खेळाडू असाधारण अशी कामगिरी करताना दिसून येत आहेत. दरम्यान पायाने टेबल टेनिस खेळणारा खेळाडू सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत पॅरा टेबल टेनिसच्या डबल्समध्ये इब्राहीम हमदातू, मिस्त्र या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. तसे टेबल टेनिस या खेळासाठी एक टेबल ,दोन रॅकेट्स, एक चेंडू आणि दोन खेळाडूंची आवश्यकता असते. तुम्ही अनेकदा टेबल टेनिस हा खेळ खेळलाही असेल किंवा खेळताना पाहिलंही असेल. परंतु कधी पायाचा आणि तोंडाचा वापर करून टेबल टेनिस खेळताना पाहिलं आहे का?
जेव्हा तुम्ही इब्राहीम हमदातूला टेबल टेनिस खेळताना पाहाल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.(Ibrahim hamadtou para table tennis star who holds rakcets by his mouth,watch photos)
https://www.instagram.com/p/CTBloFsC3P-/?utm_source=ig_web_button_share_sheet
इब्राहीम हामादातू हा मिस्त्रचा प्रोफेशनल टेबल टेनिसपटू आहे. ४८ वर्षीय इब्राहीम एलहुसेनी तोंडाने रॅकेट्स पकडतो आणि सर्व्हिस करण्यासाठी तो पायाचा वापर करतो. साधारणतः सर्व्हिस ही हातानेच केली जाते. परंतु तो पायाने हवेत चेंडू उडवून सर्व्हिस करतो आणि तोंडाने रॅकेट्स पकडून तो चेंडूला मारतो.
त्याने एकदा खुलासा केला होता की, त्याला तोंडाने रॅकेट्स पकडण्यासाठी आणि पायाने सर्व्हिस करण्याची सवय करून घेण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. तो आता दुसऱ्यांदा पॅरालिंपिक स्पर्धेत सहभागी झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भाविनाबेन पटेलने रचला इतिहास, पदक जिंकण्यापासून आहे फक्त दोन पावले दूर
यूएस ओपन विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत केली गेली कपात, मात्र युवा खेळाडूंची होणार चांदी
गेल्या ३ वर्षात एकही ग्रँड जिंकले नसले, तरी कमाईच्या बाबतीत रॉजर फेडरर ठरतोय भल्याभल्यांना भारी