टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला १७ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) याबाबत आता एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे, या स्पर्धेसाठी सगळ्या सहभागी संघांना त्यांचे अंतिम १५ खेळाडूंसोबत प्रशिक्षक आणि इतर सदस्य अशा २३ जणांची माहिती १० सप्टेंबर पर्यंत आयसीसीला सुपूर्त करायची आहे
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी (१३ ऑगस्ट) याबाबत माहिती दिली. “त्यांच्या मते आयसीसीने सर्व संघांना त्यांच्या १५ खेळाडूंसह प्रशिक्षक मिळून इतर ८ सदस्यांची यादी १० सप्टेंबरपर्यंत आयसीसीला देण्यास सांगितले आहे.”
त्याचबरोबर पीटीआयसोबत बोलताना हा अधिकारी म्हणाला, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि बायोबाबलमधील सुरक्षितता पाहता, आयसीसीने येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी प्रत्येक क्रिकेट बोर्डांना अतिरिक्त खेळाडूंना संघासोबत आणण्याची देखील अनुमती दिली आहे. परंतु, त्या अतिरिक्त खेळाडूंचा सर्व खर्च संबंधित क्रिकेट बोर्डांनाच करावा लागेल.”
साल २०१६ नंतर यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२० साली भारतात होणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करता, आयसीसीने टी-२० स्पर्धा यावर्षी यूएई आणि ओमान या दोन देशांमध्ये आयोजित करण्याचे ठरविले. ही टी-२० विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर या दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
त्याचबरोबर तो अधिकारी पुढे म्हणाला, “हे प्रत्येक क्रिकेट बोर्डावर अवलंबून आहे की, ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मुख्य संघासोबत किती अतिरिक्त खेळाडू आणू इच्छितात. मुख्य संघातील कोणताही खेळाडू जर दुखापतग्रस्त झाला किंवा कोरोना संक्रमित आढळला. तर त्याच्या जागी अतिरिक्त खेळाडूंपैकी एक खेळाडू खेळू शकतो.”
त्याचबरोबर आयसीसीने सर्व संघांना विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू होण्याच्या ५ दिवसाआधी आपल्या संघात बदल करण्याचीदेखील अनुमती दिली.
महत्वाच्या बातम्या –
–इंग्लंडच्या दिग्गज फिरकीपटूंना भारताविरुद्ध जे जमलं नाही ते मोईन अलीने करुन दाखवले
–“नीरज चोप्राचे पदक सर्व दक्षिण आशियाई लोकांचे आहे”, माजी श्रीलंकन गोलंदाजाचे भाष्य
–लॉर्ड्सवर शतक झळकवणाऱ्या केएल राहुलने एकेकाळी ‘या’ कारणामुळे स्वतःला १४ दिवस केले होते घरात बंद