कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतात सरकारने २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच लोक आपापल्या घरात वेळ घालवत आहेत. या व्हायरसच्या परिस्थितीत असे अनेक लोक आहेत, जे आपल्या जीवाची काळजी न करता लोकांची मदत करत आहेत.
हा व्हायरस जास्त पसरू नये म्हणून डॉक्टर्स, नर्स रुग्णांची काळजी घेत आहेत. याव्यतिरिक्त पोलिसही सतत गस्त घालत आहेत आणि लोकांना सुरक्षित रहाण्याचे आवाहन करत आहेत.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) जो आता हरियाणामध्ये (Haryana) डीएसपी पदावर कार्यरत आहे. जोगिंदरही रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडत आहे. त्यासाठी आता आयसीसीने (ICC) जोगिंदरची प्रशंसा (Appreciation) केली आहे.
आयसीसीने शनिवारी (२८ मार्च) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जोगिंदरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जोगिंदर क्रिकेट खेळताना आणि आपली ड्यूटी करताना दिसत आहे. आयसीसीने ट्वीट केले की, “२००७च्या टी२० विश्वचषकाचा हिरो आणि २०२०चा खरा हिरो आपल्या क्रिकेट कारकीर्दीनंतर एका पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात. भारताचा जोगिंदर जागतिक आरोग्यावरील संकटकाळात आपले काम करत आहे.”
https://twitter.com/ICC/status/1243931358138896385
जोगिंदर सध्या घरातून बाहेर पडलेल्या लोकांना पुन्हा घरी पाठवत आहे. त्याने ट्वीट केले करत लोकांना आवाहन केले की, “कोरोना व्हायरसला (Corona Virus) नष्ट करायचे असेल तर घरातच रहावे लागेल. चला एकत्र येऊया आणि या व्हायरसविरुद्ध लढूया. कृपया आम्हाला सहकार्य करा. जय हिंद.”
पाकिस्तान विरुद्ध भारतीय (Pakistan vs India) संघात २००७ साली टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. या अंतिम सामन्यात जोगिंदर भारतीय संघाचा हिरो होता. या सामन्याची शेवटचे षटक त्यानेच टाकले होते.
अंतिम सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यावेळी पाकिस्तानला केवळ ८च धावा करता आल्या. जोगिंदरच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतीय संघ पहिल्यांदाच टी२० विश्वचषक (T20 World Cup) जिंकण्यात यशस्वी झाला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-असा एक सल्ला ज्याने स्टिव स्मिथचे आयुष्यचं टाकले बदलून
-रैना सर्वात मोठा दिलदार, सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान
-ज्या बीसीसीआयला लोकांनी ट्रोल केले, त्यांनी एका झटक्यात दिले एवढे कोटी