आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने सोमवारी (27 फेब्रुवारी) महिला टी-20 विश्वचषक 2023 संपल्यानंतर टीम ऑफ द टूर्नामेंट निवडली आहे. या संघात आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना निवडले गेले आहे. कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियन संघाची मेग लेनिंगने महिला क्रिकेटवरची सत्ता यावेळी मिळवली. पण आयसीसीने टीम ऑफ द टूर्नामेंटचे कर्णधारपद लेनिंगला दिला नाही.
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 चा अंतिम सामना रविवारी संपन्न झाला. अंतिम सामन्यात मेग लॅनिंग (Meg Lanning) हिच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मात दिली आणि इतिहासातील सहावा महिला टी-20 विश्वचषक जिंकला. कर्णधाराच्या रूपात महिला टी-20 विश्वचषकात लेनिंग आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करू शकली असली, तरी आयसीसीने मात्र टीम ऑफ द टूर्नामेंटचे कर्णधारपद इंग्लंडच्या नॅट सायव्हर (Nat Sciver-Brunt) हिच्या हाती सोपवले. संघात चार खेळाडू ऑस्ट्रेलियन, तीन खेळाडू दक्षिण आफ्रिका संघाचे आहेत. इंग्लंडच्या दोन, तर भारत आणि वेस्ट इंडीज संघाचा प्रत्येका एका खेळाडूला या संघात सामील करण्यात आले आहे. टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये निवडलेल्या बहुतांश खेळाडू उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते. एकडा वेस्ट इंडीज संघ उपांत्य सामन्यात जागा बनवू शकला नव्हता.
आयसीसीने टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये एकमात्र भारतीय खेळाडू ऋचा घोष (Richa Ghosh) हिला निवडले आहे. ऋचाने विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये एकूण 136 धावा केल्या. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नसला, तरी तिचे प्रदर्शन संघासाठी फायद्याचे ठरले. तिने फलंदाजीसह यष्टीरक्षकाच्या भूमिकेत देखील संघासाठी योगदान दिले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यात मात्र ऋचा स्वस्तात बाद झाली. परिणामी भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आणि अंतिम सामन्यात खेळण्याची इच्छाही अपूर्ण राहिली.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2023ची टीम ऑफ द टूर्नामेंट
ताजमिन ब्रिट्स, एलिसा हिली (यष्टीरक्षक), लॉरी वोलवार्ट, नॅट सायव्हर (कर्णधार), एश्ले गार्डनर, ऋचा घोष, सोफी एक्लेस्टन, करिश्मा रॅनहार्क, डार्सी ब्राउन, शबनिम इश्माइल, मेगन सुट.
(ICC announces Team of the Tournament after Women’s T20 World Cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वरळीचे छपरी! श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, कॅप्शन वाचाच
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका! तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसह वनडे संघातून पॅट कमिन्स घेणार माघार?