सध्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023चे क्वॉलिफायर सामने खेळले जात आहेत. झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या या सामन्यांमध्ये युनायटेट स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे यूएसए संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. यूएसएचा वेगवान गोलंदाज कायल फिलिप याच्यावर आयसीसीकडून बंधी घातली गेली आहे.
वनडे विश्वचषकासाठी क्वॉलिफायर सामने खेळताना कायल फिलिप (Kyle Phillip) याने वेस्ट इंडीज संघाविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या नजरेत आला. कायलची गोलंदाजी अवैध ठरवली गेली. पंचांच्या मते गोलंदाजाची ऍक्शन आयसीसीच्या नियमात बसत नाही आणि याच कारणास्तव त्याच्यावर बंदी घातली गेली. आयसीसी नियमांनुसार अनुच्छेत 6.7 लावून त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी घातली गेली आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध 18 जून रोजी झालेल्या सामन्यात फिलिपने तीन विकेट्स घेतल्या होत्या. पण 26 वर्षीय गोलंदाजाची ऍक्शन पाहून त्याविषयी शंका उपस्थित केली गेली. त्यानंतर आयसीसीच्या पॅनलने त्याच्यावर कारवाई केली. नियमांनुसार त्याच्यावरील बंदी तोपर्यंत कायम असेल, जोपर्यंत तो स्वतःच्या गोलंदाजी ऍक्शनचे मुल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव देत नाही. त्यानंतर त्याला आपली गोलंदाजी योग्य आणि नियमात असल्याचे सिद्ध करावे लागेल.
दरम्यान, आयसीसी विश्वचषक क्वॉलिफायर सामन्यांचा विचार केला, तर यूएसए संघासाठी ही स्पर्धा निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एकही सामना त्याला त्यांना जिंकता आला नाहीये. गुरुवारी (22 जून) यूएसए संघ नेदर्लंडकडून 5 विकेट्सने पराभूत झाला. अशात संघ सुपर 6 फेरीमध्ये पोहोचण्याची आशा खूपच कमी आहे. सध्या यूएसके संघ ग्रुप एमध्ये सर्वात शेवटची म्हणजेच पाचव्या क्रमांकावर आहे. लीग स्टेजचा शेवटचा सामना यूएसए संघ 26 जून रोजी झिम्बाब्वेविरुद्ध खेळेल. क्वॉलिफायर स्पर्धेचा एकंदरीत विचार केला, तर सध्या ग्रुप ए मध्ये वेस्ट इंडीज संघ पहिल्या स्थानावर आहे. तर ग्रुप बी मध्ये ओमानचे प्रदर्शन सर्वोत्तम आहे. (ICC bans USA fast bowler Kyle Phillips)
महत्वाच्या बातम्या –
बरोबर 16 वर्षांपुर्वी क्रिकेटमध्ये सुरू झालेले हिटमॅन पर्व! येत्या काळात भारतासाठी करणार ‘ही’ मोठी कामगिरी
MPL 2023 । प्लेऑफमधील शेवटच्या स्थानासाठी ‘असे’ आहे समिकरण! पुणेरी बाप्पाचे पारडे जडच