बीसीसीआयचे सचिव जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष बनले आहेत. 35 वर्षीय शाह 1 डिसेंबरपासून पदभार स्वीकारतील. जय शाह या महत्त्वाच्या पदावर विराजमान झाल्यानंतर साहजिकच प्रश्न उभा राहतो की, त्यांना आयसीसीचे अध्यक्ष म्हणून महिन्याला किती रुपये वेतन मिळेल. जर तुमच्या मनात देखील हा प्रश्न उपस्थित झाला असेल, तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.
सर्वप्रथम जाणून घेऊया, जय शाह यांना बीसीसीआयचे सचिव असताना किती रुपये वेतन मिळायचं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळात अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष ही पदं ‘मानद पदं’ मानली जातात. या पदांवर काम करणाऱ्या लोकांचं मासिक वेतन ठरावीक नसतं. त्यांना बोर्डाकडून काम करण्यासाठी ‘भत्ता’ मिळतो. कामादरम्यान त्यांना बऱ्याच प्रकारचे भत्ते आणि खर्च मिळतात.
बीसीसीआयचे ‘मानद अधिकारी’ जेव्हा आयसीसी बैठक किंवा भारतीय संघाची संबंधीत कोणत्याही कामासाठी विदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा त्यांना दर दिवसाचा सुमारे 82 हजार रुपये भत्ता मिळतो. याशिवाय त्यांना बोर्डाकडून फर्स्ट क्लास विमान टिकीटांसारख्या सुविधाही मिळतात.
मानद अधिकारी जेव्हा देशात बैठकांसाठी जातात, तेव्हा त्यांना दिवसाचा 40 हजार रुपये भत्ता मिळतो. सोबतच बिझनेज क्लासनं प्रवासाची सुविधाही दिली जाते. याशिवाय बैठकींव्यतिरिक्त जेव्हा ते अन्य कामांसाठी दुसऱ्या शहराचा प्रवास करतात, तेव्हा त्यांना दिवसाचे 30 हजार रुपये भत्ता मिळतो. तसेच त्याच्या हॉटेलर्चा खर्च देखील बोर्ड उचलतं.
आता तुमच्या लक्षात आलं असेल की, बीसीसीआयच्या मानद अधिकाऱ्यांना वेतन नव्हे तर कामानुसार भत्ता दिला जातो. बीसीसीआय प्रमाणेच, आयसीसीच्या मानद पदांवर विराजमान अधिकाऱ्यांना देखील वेतनाच्या ऐवजी भत्ता दिला जातो. मात्र आयसीसी अधिकाऱ्यांचा भत्ता किती असतो? याबाबत आयसीसीकडून अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा –
ICC Champion’s Trophy 2025: जय शाह हिसकावून घेणार पाकिस्तानचे यजमानपद?
जय शाह आयसीसी अध्यक्ष बनले, आता बीसीसीआयचे सचिव कोण होणार? हे 3 नावं आघाडीवर
कोण आहेत रोहन जेटली? जे जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव बनू शकतात