टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि इंग्लंड (PAKvNZ) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यादिवशी पाऊस पडणार असा अंदाज स्थानिक वेधशाळेने दिला आहे. यामुळे चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. त्यातच या सामन्यासाठी नियमामध्ये काही बदल करण्यात आला आहे. ज्याचा वेळ येईल तेव्हा उपयोगी पडेल.
अंतिम सामन्यासाठी जो बदल करण्यात आला तो सामना वेळेत सुरू झाला त्यावर अवलंबून असणार आहे. कारण रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असे ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे सामना पूर्ण खेळायचा असेल तर अतिरिक्त वेळेचा उपयोग केला जाईल.
आयसीसीने आधीच बाद फेरीच्या सामन्यांसाठी ‘रिजर्व डे’ घोषित केला आहे. यामुळे सामना जर 13 नोव्हेंबरला झाला नाही तर 14 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल, मात्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस पडणार असल्याने अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयसीसीने अंतिम सामन्यासाठी दोन तास अधिक जोडले आहेत, ज्याचा वेळ येईल तेव्हा वापर करता येईल. तसेच अंतिम सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघाने 10-10 षटके खेळणे आवश्यक आहे आणि असे नाही झाले तर पाकिस्तान-इंग्लंडला संयुक्तपणे विजेता ठरवण्यात येईल.
आयसीसीचे म्हणणे आहे की, सामना रविवारीच पूर्ण खेळता येईल असा प्रयत्न केला जाईल. तसेच सामना रिजर्व-डे ला गेला तर लवकर सुरू करण्यात येईल. icc change the rules for pak v nz final match t20 world cup
या स्पर्धेतील चार ते पाच सामने पावसामुळे रद्द झाले होते. यातील सर्वाधिक सामने मेलबर्नमध्येच खेळले गेले. रविवारीही मेलबर्नमध्ये 95 टक्के आणि 14 नोव्हेंबरला 90 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याचा जो विजेता होईल तो वेस्ट इंडिजच्या विक्रमाची बरोबरी करेल. वेस्ट इंडिजने 2012 आणि 2016मध्ये टी20 विश्वचषक जिंकला आहे. तसेच पाकिस्तानने 2009 आणि इंग्लंडने 2010मध्ये टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ए भावा! ते ‘प्लेअर ऑफ द मॅच’ कसं निवडतात? माहिती नसेल, तर एका क्लिकवर घ्या जाणून
हार्दिक पांड्याचा संघ न्यूझीलंडला रवाना; सूर्या, चहल आणि पंत एयरपोर्टच्या जमिनीवर झोपताना दिसले