---Advertisement---

असे होणार आहेत टीम इंडियाचे २०१९ विश्वचषकाआधी सराव सामने

---Advertisement---

आयसीसी वन-डे विश्वचषक 2019ला 30मेपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी प्रत्येक संघाला दोन सराव सामने खेळावे लागणार आहे. या सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने काही महिन्यांपूर्वी जाहीर केले आहे.

हे सराव सामने 24 ते 28 मे, 2019च्या दरम्यान खेळले जाणार आहेत. हे सामने ब्रिस्टल काऊंटी ग्राउंड, कार्डिफ वेल्स स्टेडियम, हॅम्पशायर बाऊल आणि ओव्हल येथे होणार आहेत. या सराव सामन्यांच्या तिकीट विक्रीची माहिती आज(8 एप्रिल) दिली आहे.

त्यानुसार उद्यापासून(10 एप्रिल) सराव सामन्यांच्या तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाआधी होणाऱ्या 10 सराव सामन्यांपैकी 7 सराव सामन्यांच्या तिकीटांचा दर हा प्रौढांसाठी 15 यूरो आणि 16 वर्षांखालील असणाऱ्या मुलांसाठी 1 यूरो असा असणार आहे.

तसेच 25 एप्रिलला होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, तर 27 एप्रिलला होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध आफगाणिस्तान या तीन सामन्यांसाठी 25 यूरो, 20 यूरो आणि 15 यूरो असा प्रौढांसाठी तिकीट दर असणार आहे. तर 16 वर्षांखालील मुलांसाठी 1 यूरो हा दर कायम असणार आहे.

मात्र जर सामन्यांच्या ठिकाणी सामन्याच्याच दिवशी तिकीट खरेदी केले तर 5 यूरो जास्त मोजावे लागणार आहेत.

भारताचा पहिला सराव सामना 25 मे, 2019ला न्यूझीलंड विरुद्ध ओव्हल मैदानावर होणार आहे. तर दुसरा सामना 28 मे, 2019ला बांगलादेश विरुद्ध कार्डिफ वेल्स स्टेडियमवर होणार आहे.

या सराव सामन्यांमध्ये 15 जणांच्या संघातील कोणतेही खेळाडू खेळू शकणार आहेत. त्यामुळे  या सामन्यांना आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटचा दर्जा मिळणार नाही. हे सराव सामने 50-50 षटकांचे होणार आहेत.

विश्वचषकात प्रथमच सर्व संघ एकमेंकाविरुद्ध साखळी फेरीचे सामने खेळणार आहेत. त्यामध्ये भारताचा पहिला सामना 5 जूनला भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्याचबरोबर या विश्वचषकाचा अंतिम सामना 14 जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे.

आयसीसी विश्वचषक 2019चे भारताचे सामने-

25 मे, 2019 – भारत विरुद्ध न्यूझीलंड (पहिला सराव सामना)

28 मे, 2019 – भारत विरुद्ध बांगलादेश (दुसरा सराव सामना)

5 जून, 2019 –  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

9 जून, 2019 – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

13 जून, 2019 – भारत विरुद्ध न्यूझीलंड

16 जून, 2019 – भारत विरुद्ध पाकिस्तान

22 जून, 2019 – भारत विरुद्ध अफगाणिस्तान

27 जून, 2019 – भारत विरुद्ध विंडीज

30 जून, 2019 – भारत विरुद्ध इंग्लंड

2 जुलै, 2019 – भारत विरुद्ध बांगलादेश

6 जुलै, 2019 – भारत विरुद्ध श्रीलंका

उपांत्य फेरी – 

पहिला उपांत्य सामना – 9 जुलै

दुसरा उपांत्य सामना – 11 जुलै

अंतिम सामना- 14 जुलै

महत्त्वाच्या बातम्या – 

या गोष्टीचा विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडताना विचार केला जाणार नाही!

प्रो कबड्डी २०१९ मध्ये एकाच संघाकडून खेळणार देसाई बंधू!

हरभजननने सांगितला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील हा मोठा फरक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment