ICC Loss During T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय राहिले. या संपूर्ण स्पर्धेत अजेय राहत भारतीय संघाने टी20 विश्वचषक ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तब्बल 17 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषक उंचावला. परंतु 140 कोटी भारतीयांसाठी स्वप्नवत राहिलेला हा टी20 विश्वचषक, आयसीसीला मात्र महागात पडला आहे. ते कसे? जाणून घेऊया…
यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषक 2024 चे आयोजन करण्यात आले होते. आयसीसीने या स्पर्धेदरम्यान खूप पैसा खर्च केला होता. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेत आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. आयसीसीला ही स्पर्धा हिट होण्याची पूर्ण अपेक्षा होती, पण आयसीसीच्या वार्षिक बैठकीपूर्वी टी20 विश्वचषकाशी संबंधित एक मोठा खुलासा झाला आहे. खरे तर, अमेरिकेत खेळल्या गेलेल्या विश्वचषक सामन्यांमध्ये आयसीसीला करोडोंचे नुकसान झाले आहे.
यावेळी आयसीसी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे वार्षिक बैठक आयोजित करत आहे. 19 जुलै ते 22 जुलै दरम्यान ही बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, ज्यावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या बैठकीत अमेरिकेमध्ये टी20 विश्वचषक सामने आयोजित करताना आयसीसीला झालेल्या 2 कोटी अमेरिकेन डॉलर्सच्या नुकसानाबद्दल चर्चा होऊ शकते. भारतीय रुपयांमध्ये आयसीसीचे हे नुकसान पाहिले तर ते 167 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
The ICC lost more than 160cr for hosting the 2024 T20 World Cup in the USA. (TOI). pic.twitter.com/4zhEywCdjL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 18, 2024
विश्वचषकादरम्यान स्टेडियममधील खुर्च्या होत्या रिकाम्या
टी20 विश्वचषकादरम्यान अनेक सामन्यांमध्ये स्टेडियम पूर्णपणे रिकामे दिसले. वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये चाहत्यांची उपस्थिती असली तरी, अमेरिकेत खेळल्या गेलेल्या सामन्यांदरम्यान अनेक स्टँड भरले नसल्याचे दिसून आले होते. विश्वचषकादरम्यान अमेरिकेत स्पर्धेचे प्रमोशन योग्य पद्धतीने झाले नाही, असे मानले जाते. तिकिटाचे दरही खूप जास्त होते. त्यामुळे स्टेडियममध्ये चाहते कमी दिसले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय आयसीसीने कोट्यवधी रुपये खर्चून अमेरिकेत नवे स्टेडियमही बांधले होते, मात्र भारताच्या सामन्याशिवाय ते स्टेडियम अन्य कोणत्याही सामन्यात भरलेले दिसले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान बिघडवणार आयपीएल 2025 चा खेळ! ‘या’ बड्या संघाचे स्टार क्रिकेटपटू होऊ शकतात बाहेर
निवड समितीला हार्दिकचं प्रतित्युत्तर? पोस्ट शेअर करत दिले फिटनेसची झलक
पाकिस्तानच्या धमक्यांना घाबरले नाही बीसीसीआय! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, भारत ‘या’ देशात खेळणार सामने