नुकताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघामध्ये ऍशेस मालिकेचा (Aahes series) थरार पाहायला मिळाला होता. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने ४-० ने विजय मिळवला होता. या मालिकेत मिळवलेल्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाला आयसीसी कसोटी संघांच्या यादीत जबरदस्त फायदा झाला आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे.(icc latest test rankings)
नुकताच आयसीसीने कसोटी संघांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने पहिल्या स्थानी मजल मारली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने काही दिवसांपूर्वीच इंग्लंड संघाला ४-० ने पराभूत करत कसोटी मालिकेवर कब्जा मिळवला होता, तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यात झालेल्या मालिकेत भारतीय संघाचा २-१ ने पराभव झाला होता.
या परभवामुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ कसोटी संघाच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर न्यूझीलंड (New Zealand) संघाने दुसऱ्या स्थानी उडी मारली आहे.
अधिक वाचा – कसोटी मालिका गमावूनही कोहली, बुमराहची आयसीसी क्रमवारीत ‘उंच उडी’, रोहितही टॉप-१० मध्ये
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत चांगली सुरुवात केली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता. त्यानंतर मालिकेतील दुसरा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकत बरोबरी केली होती. तसेच या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या नावावर करत मालिका २-१ ने आपल्या नावावर केली होती.
या मालिकेत विजय मिळवल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला देखील फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिका संघ १०१ रेटिंग पॉईंट्ससह पाचव्या स्थानी पोहोचला आहे. विशेष म्हणजे या मालिकेनंतर भारताचा फलंदाज विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
व्हिडिओ पाहा – २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही
तसेच न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेली मालिका बरोबरीत सुटली होती. ज्यामुळे न्यूझीलंड संघाला आपले दुसरे स्थान टिकवून ठेवण्यात यश आले आहे. ऑस्ट्रेलिया संघ ११९ रेटिंग पॉईंट्ससह पहिल्या स्थानी आहे, तर न्यूझीलंड संघ ११७ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच भारतीय संघ ११६ रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान संघ या यादीत सहाव्या स्थानी आहे. त्यानंतर टॉप १० संघांमध्ये श्रीलंका,वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या :
तीन वर्षे आणि तब्बल २३३ चेंडूंनंतर बुमराहला मिळाली ‘ती’ विकेट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संपवला दुष्काळ
चार चेंडूवर ४ बळी!! विश्वास नाही बसणार पण हे घडलंय, BBLमध्ये ऑसी गोलंदाजाचा भन्नाट कारनामा
हे नक्की पाहा: