बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२३-२०२७ हंगामांच्या प्रसारणाचे हक्क मोठ्या किंमतीना विकले, याची अजुनही चर्चा सुरू आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) प्रसारण हक्कांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसीने शुक्रवारी (१७ जून) आगामी विश्वचषक स्पर्धांच्या प्रसारणाच्या हक्कांच्या लिलावाच्या तारखेची घोषणा केली आहे.
आयसीसी २०२४पासून पुढील आठ वर्षे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धांच्या सामन्यांच्या प्रसारण हक्कांचा या लिलावामध्ये समावेश करणार आहे. २० जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धांच्या मीडिया अधिकारासाठी निविदा टू टेंडर (आयटीटी)ने पहिले निमंत्रण जाहीर केले आहे. आयटीटी फक्त भारतापुरते मर्यादित आहे. या लिलावात पुरूष आणि महिलांच्या ३५० पेक्षा अधिक विश्वचषक सामने समाविष्ट केले गेले आहेत. तीन पॅकेजचे स्वरूप असणाऱ्या या लिलावामध्ये महिलांच्या १९ वर्षाखालील टी२० विश्वचषक याचा समावेश आहे.
आयसीसी (ICC) प्रथमच महिला आणि पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धांच्या प्रसारण हक्कांचा लिलाव वेगवेगळा करणार आहे. आयसीसीने ठरवलेल्या तीन पॅकेजमध्ये पहिल्या ए पॅकेजमध्ये टीव्ही प्रसारण, बी पॅकेजमध्ये डिजिटल प्रसारण आणि सी पॅकेजमध्ये टीव्ही आणि डिजिटल या दोन्ही प्रसारणाचा समावेश केला आहे. बीसीसीआयने (BCCI) तीन दिवस आयोजित केलेल्या आयपीएल ई-लिलाव ४८,३९० कोटी रुपयांना विकला गेला. त्याचबरोबर या भक्कम कमाईच्या शर्यतीत आयपीएल ही जगातील दुसरी महागडी स्पर्धा ठरली आहे. आयपीएल २०२३-२०२७ चे भारतातील टीव्ही प्रसारण हक्क डिज्नी-स्टार (Disney Star) याने मिळवले तर भारतीय उपमहाव्दिपाचे डिजिटल प्रसारण हक्क वायकॉम १८ ने मिळवले.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अलॉर्डीस म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट सातत्याने प्रचंड प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे आयसीसी स्पर्धांसाठी प्रसारणातून लक्षणीय रस निर्माण होत आहे. सर्वाधिक चाहते जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट खेळाडूंना क्रिकेटच्या सर्वात प्रतिष्ठित चषक स्पर्धा पाहण्यास उत्सुक आहेत.”
या लिलावामध्ये सोळा पुरूषांच्या (आठ वर्षांपेक्षा अधिक) स्पर्धा आणि सहा महिलांच्या (चार वर्षांपेक्षा अधिक) स्पर्धांच्या अनुक्रमे ३६२ पेक्षा अधिक आणि १०३ पेक्षा अधिक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क विकण्याची शक्यता आहे. तसेच आठ वर्षांच्या भागीदारीसाठी बोली लावण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तेव्हा असं वाटतं, मी म्हातारा झालोय’, मुरली कार्तिकच्या प्रश्नावर असं का म्हणाला डीके?
नाद नाद नादच! सर्वात मोठी धावसंख्या, सर्वाधिक षटकार, नेदरलँडविरुद्ध इंग्लंडने रचले अर्धा डझन विक्रम
आवेश खानने वडिलांना समर्पित केल्या आपल्या ४ विकेट्स, कारण जाणून तुम्हीही ठोकाल सलाम!