भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान टी२० विश्वचषकाचे आयोजन ओमान आणि संयुक्त अरब अमिराती येथे करणार आहे. हा टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे.
या विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून पहिल्या फेरीपासून होईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धेला म्हणजेच सुपर १२ फेरीला सुरुवात होईल. या स्पर्धेचा पहिला सामना ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. तसेच सुपर १२ फेरीतील पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने होईल. यानंतर २४ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ दुबई येथे आमने-सामने येतील.
बाद फेरीचे सामने १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडतील. १० आणि ११ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होतील, तर १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल.
या विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी संघांची गट विभागणी २० मार्च २०२१ पर्यंतच्या संघ क्रमवारीनुसार करण्यात आली आहे. या विश्वचषकात क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी होईल. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.
आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर १२ फेरीसाठी गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा पहिल्या गटात समावेश आहे. या गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील. तसेच सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. तसेच या गटातही पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील.
सुपर १२ च्या फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी एकमेकांसमोर येतील.
पहिल्या फेरीत ८ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या देशांचा समावेश आहे. त्यांचीही २ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात श्रीलंका, आयर्लंड, नामीबिया आणि नेदरलंड्स यांचा समावेश आहे. तर ब गटात ओमान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेचे सर्व सामने दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबुधाबीमधील शेख झायद स्टेडियम, शारजाहमधील शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड येथे पार पडणार आहे. तसेच या स्पर्धेत डबल हेडर म्हणजेच एका दिवशी २ सामने होणार आहेत. डबल हेडरच्या वेळी पहिला सामना स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता, तर दुसरा सामना स्थानिक प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरु होईल.
असे आहे संपूर्ण वेळापत्रक – (वेळ – स्थानिक प्रमाणवेळेनुसार)
पहिली फेरी –
१७ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी, मस्कत ( दुपारी- २.०० वाजता)
१७ ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, मस्कत ( संध्या- ६.०० वाजता)
१८ ऑक्टोबर – आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
१८ ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध नामिबिया, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
१९ ऑक्टोबर – स्कॉटलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी, मस्कत ( दुपारी- २.०० वाजता)
१९ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध बांगलादेश, मस्कत ( संध्या- ६.०० वाजता)
२० ऑक्टोबर – नामिबिया विरुद्ध नेदरलँड, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
२० ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
२१ ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध पापुआ न्यू गिनी, मस्कत ( दुपारी- २.०० वाजता)
२१ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध स्कॉटलंड, मस्कत ( संध्या- ६.०० वाजता)
२२ ऑक्टोबर: नामिबिया विरुद्ध आयर्लंड, शारजाह ( दुपारी- २.०० वाजता)
२२ ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध नेदरलँड, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
सुपर १२ फेरी –
२३ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
२३ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
२४ ऑक्टोबर – अ गटातील अव्वल संघ विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, शारजाह ( दुपारी- २.०० वाजता)
२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
२५ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
२६ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज, दुबई ( दुपारी- २.०० वाजता)
२६ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
२७ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
२७ ऑक्टोबर – ब गटातील अव्वल संघ विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, अबू धाबी ( संध्या- ६.०० वाजता)
२८ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई ( दुपारी- २.०० वाजता)
२९ ऑक्टोबर – वेस्ट इंडीज विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, शारजाह ( दुपारी- २.०० वाजता)
२९ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
३० ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, शारजाह ( दुपारी- २.०० वाजता)
३० ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
३१ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
३१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
१ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
२ नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
२ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
३ नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई ( दुपारी- २.०० वाजता)
३ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
४ नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, दुबई ( दुपारी- २.०० वाजता)
४ नोव्हेंबर – वेस्ट इंडिज विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
५ नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, शारजाह ( दुपारी- २.०० वाजता)
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
६ नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
६ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
७ नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
७ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
बाद फेरी –
१० नोव्हेंबर – उपांत्य सामना – १, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
११ नोव्हेंबर – उपांत्य सामना – २, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
१४ नोव्हेंबर – अंतिम सामना, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
महत्त्वाच्या बातम्या –
सुट्टी नाय..! ‘भारताविरुद्ध पराभव झाल्यास घरी येऊ देणार नाही…’, पाकिस्तानच्या कर्णधाराला धमकी
शास्त्रींपेक्षा जास्त पगार ते भारतीय संघाहून अधिक जबाबदारी, द्रविडसाठी बीसीसीआयची मोठी योजना