---Advertisement---

T20 WC26: 20 वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी खेळला हॉकी वर्ल्डकप, आता ‘या’ क्रिकेट संघाचा कर्णधार

On: मंगळवार, फेब्रुवारी 3, 2026 5:06 PM
---Advertisement---

येत्या ७ फेब्रुवारीपासून आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ सुरू होत आहे. यामध्ये २० देशांचे संघ सहभागी झाले आहेत. आतापर्यंत सर्वांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. टी२० विश्वचषकाच्या इतिहासात एका आवृत्तीत प्रथमच एवढे संघ खेळणार आहेत. या संघामधील एकाचा कर्णधार, ज्याच्याविषयी खास माहिती समोर आली आहे.

इटलीचा कर्णधार ४२ वर्षीय वेन मॅडसेन आहे. त्याच्याकडून इटलीला अधिक अपेक्षा आहे. तो एक उत्तम फलंदाज असून त्याने वेगवेगळ्या टी२० लीगही खेळल्या आहे. त्याच्याविषयी विशेष बाब म्हणजे त्याने २० वर्षाआधी दक्षिण आफ्रिकेच्या हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता तो क्रिकेटमध्ये इटलीचे नेतृत्व करत आहे.

मॅडसेन २००६च्या हॉकी विश्वचषकात खेळला होता. संघाने विश्वचषकात ५ सामने खेळले होते. ज्यातील तीन सामने गमावले आणि दोन सामने अनिर्णीत राहिले. अनिर्णीत राहिलेले सामने भारत (१-१) आणि साऊथ कोरिया (२-२) या संघांविरुद्ध खेळले गेले होते. तसेच त्या विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत ११व्या स्थानासाठी सामना खेळला गेला. जो सामना दक्षिण आफ्रिकेने ०-१ असा गमावला.

मॅडसेनने २००६मध्ये हॉकी विश्वचषक खेळण्याआधीच २००४मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए चे सामने क्वाझुलू-नताल संघाकडून खेळले. त्या विश्वचषकानंतर तो इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये डर्बीशायरकडून खेळला. काही वर्षानंतर तो इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास पात्र ठरला, मात्र त्याला इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आले नाही.

मॅडसेनला ७ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये त्याने दोन अर्धशतक केली असून २०५ धावा केल्या आहेत. त्याने २०२३मध्ये क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली.

मॅडसेनने आतापर्यंत २१९ टी२० प्रकाराचे सामने खेळले आहेत. ज्यातील २११ डावांमध्ये २ शतके आणि २५ अर्धशतके करताना ५५१६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने २२ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने टी२० ब्लास्ट, द हंड्रेड, एसए२० आणि पाकिस्तान प्रिमीयर लीग खेळल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---