---Advertisement---

टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; आयसीसीकडून संघांची गटवारी जाहीर

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 4:23 PM
Rohit Sharma Shikhar Dhawan and Amir
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान टी२० विश्वचषकाचे आयोजन ओमान आणि संयुक्त अरब अमिराती येथे करणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी शुक्रवारी (१६ जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संघांची गटवारी जाहीर केली आहे. हा टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे.

हा विश्वचषक यापूर्वी भारतात आयोजित केला जाणार होता. मात्र, कोरोनाचे संकट पाहाता विश्वचषकाचे आयोजन ओमान आणि युएईमध्ये करण्यात आले आहे. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ सुपर १२ च्या फेरीत आमने-सामने येणार आहेत. कारण दोन्ही संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.

या टी२० विश्वचकासाठी संघांची गट विभागणी २० मार्च २०२१ पर्यंतच्या संघ क्रमवारीनुसार करण्यात आली आहे. या विश्वचषकात क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी होईल. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.

आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर १२ फेरीसाठी गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा पहिल्या गटात समावेश आहे. या गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील. तसेच सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. तसेच या गटातही पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील.

पहिल्या फेरीत ८ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या देशांचा समावेश आहे. त्यांचीही २ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात श्रीलंका, आयर्लंड, नामीबिया आणि नेदरलंड्स यांचा समावेश आहे. तर ब गटात ओमान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे. (ICC Men’s T20 World Cup groups announced)

या विश्वचषकात आधी पहिल्या फेरीतील सामने पार पडतील. त्यानंतर सुपर १२ च्या फेरीला सुरुवात होईल. हे सामने दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबुधाबीमधील शेख झायद स्टेडियम, शारजाहमधील शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड येथे पार पडणार आहे. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याचे आयसीसीने सांगितले आहे.

टी२० विश्वचषकासाठी संघांची गटवारी
पहिली फेरी 
गट अ – श्रीलंका, आयर्लंड, नामीबिया आणि नेदरलंड्स
गट ब – ओमान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी

सुपर १२ फेरी
पहिला गट – वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका, गट अ मधील अव्वल क्रमांकाचा संघ आणि गट ब मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ
दुसरा गट – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट अ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि गट ब मधील अव्वल क्रमांकाचा संघ

महत्त्वाच्या बातम्या –

‘नगमा अन् दादाच्या अफेरबद्दल सर्वकाही माहितय,’ म्हणत प्रसिद्ध लेखकाकडून बायोपिकची स्टोरी लिहिण्याची इच्छा व्यक्त

भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील मालिकांच्या तारखांनंतर आता वेळेतही झाला बदल, पाहा किती वाजता सुरु होणार सामने

जबरदस्त! इंग्लंडच्या सलामीवीरने जोखीम घेत स्टंपजवळून मारला भन्नाट शॉट अन् चेंडू सीमारेषेपार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---