---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये इतिहासातील सर्वात मोठा बदल करण्याच्या विचारात आहे आयसीसी

On: मंगळवार, डिसेंबर 31, 2019 1:48 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व्यस्त वेळापत्रकातील वेळ वाचवण्याच्या दृष्टीने 2023 पासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशिपमधील सामने चार दिवसीय करण्याचा विचार करीत आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार यामागे अनेक कारणे आहेत ज्यात आयसीसीला अधिक जागतिक स्पर्धा आयोजित करायाच्या आहेत.

तसेच बीसीसीआयने या मोसमात आणखी द्विपक्षीय सामने आयोजित करण्याची मागणी केली आहे. याशिवाय टी20 लीगचाही जगभर प्रसार होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन आयसीसी कसोटी सामने पाच दिवसांऐवजी चार दिवसांचे करण्याचा विचार करत आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रोबर्टर्स यांनी एसइएन रेडिओला सांगितले की, ‘या प्रकाराबद्दल आपण गांभीर्याने विचार करायला हवा.’

ते म्हणाले, ‘हा असा मुद्दा असा आहे ज्यावर भावनिक नव्हे तर तथ्यावर आधारित विचार करण्याची गरज आहे. वेळ आणि षटकांच्या बाबतीत गेल्या पाच-दहा वर्षांत कसोटी सामन्यांची सरासरी लांबी किती आहे हे पाहणे आवश्यक आहे.’

रॉबर्ट्स म्हणाले, ‘आम्हाला हे फार काळजीपूर्वक पाहावे लागेल. आम्ही पुढील 12 ते 18 महिन्यांच्या दरम्यान 2023 ते 2031 पर्यंतचे वेळापत्रक निश्चित करण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्यासाठी आयसीसीच्या सदस्यांसमवेत काम करत आहोत.’

‘प्रत्येकजण सांगत आहे की हे सोपे नाही, परंतु आम्ही त्याकडे वेगळ्या दृष्टीने पहात आहोत, आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत.’

मात्र असे असले तरी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचे याबदद्ल वेगळे मत आहे. तो म्हणाला, ‘जर असे(4 दिवसीय कसोटी सामने) झाले असते तर कदाचीत ऍशेसमध्ये निकाल मिळाले नसते. मला वाटते प्रत्येक सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला.’

‘हा कसोटी क्रिकेटचा मुद्दा आहे, हे पाच दिवसांबद्दल आहे, ते मानसिकदृष्ट्या कठीण आहे, शारीरिकदृष्ट्या तो कठीण आहे आणि चार दिवसांच्या प्रथम श्रेणीतील सामन्यांपेक्षा पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंची अधिक परिक्षा होते. मला वाटते की हे असेच करण्यासाठी तयार केले गेले आहे, त्यामुळे मला आशा आहे की हे असेच राहील.’

तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संघाचे प्रमुख (FICA) टोनी आयरिश क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले, चार दिवसांचे कसोटी सामने हा अनेक समस्यांवरील तोडगा आहे. यामुळे क्रिकेटच्या तीन्ही स्वरुपांना एकाच छताखाली आश्रय देता येईल. यासाठी सुसंगत रचना तयार करावी लागेल.

यावर्षीच जूलैमध्ये लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात चार दिवसीय कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यात इंग्लंडने 143 धावांनी विजय मिळवला होता. तसेच 2017 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे संघातही असा सामना झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---