ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून पुरूषांचा टी20 विश्वचषक (T20 World Cup)सुरू होत आहे. यासाठी जवळपास सर्व संघ ऑस्ट्रेलियात पोहोचले आहे. काही संघाचे सराव सामनेही खेळले गेले. भारताचा संघ सध्या टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तसेच टी20 विश्वचषकासाठी आयसीसीने सर्व 16 संघाच्या सलामीच्या जोडींना क्रमांक दिला आहे. चकीत करणारी बाब म्हणजे या क्रमवारीत भारताची रोहित शर्मा-केएल राहुल या खतरनाक जोडीला पहिला क्रमांक दिलेला नाही.
आयसीसीच्या सलामी जोडीच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पाकिस्तानची जोडी आहे. पाकिस्तानचे बाबर आझम-मोहमम्द रिझवान ही सलामीची जोडी आयसीसीच्या मते सर्वात धोक्याची आहे. जर आयसीसीने जाहीर केलेल्या सलामी जोडींची आपण आकडेवारी पाहिली तर त्यावरून स्पष्ट होते की अव्वल क्रमांक पाकिस्तानला का दिला गेला.
मागील पाच सामन्यांमधील कामगिरी पाहिली तर पाकिस्तानच्या या सलामीजोडीने 392 धावा केल्या आहेत, तर भारताच्या सलामीवीरांनी 280 धावा केल्या आहेत. तसेच भारताच्या जोडीचा स्ट्राईक रेट 140 पेक्षा अधिक राहिला आहे, तर पाकिस्तानच्या जोडीने 130 पेक्षाही कमी स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. आयसीसी पुरूषांच्या टी20 फलंदाजी क्रमवारीत बाबर तिसऱ्या, रिझवान पहिल्या, रोहित 16व्या आणि राहुल 14व्या स्थानावर आहे.
आयसीसीने तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवे आणि मार्टिन गप्टिल यांना ठेवले आहे, तर चौथ्या क्रमांकावर यजमान ऑस्ट्रेलियाची ऍरॉन फिंच आणि डेविड वॉर्नर ही जोडी आहे. पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेची पथुम निसांका आणि कुशल मेंडीस, दुसरीकडे अफगाणिस्तानचे रहमनुल्लाह गुरबाज-हरतुल्लाह जजई ही जोडी आहे. इंग्लंडच्या जोस बटलर-ऍलेक्स हेल्स या जोडीला सातव्या क्रमांकावर ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेची टेम्बा बामुवा- क्विंटन टी कॉक आठव्या क्रमांकावर आहे.
या विश्वचषकात भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेच सलामीला येणार हे निश्चित आहे. तसेच त्या दोघांनाही ऑस्ट्रेलियात संघाला चांगली सुरूवात करून द्यावी लागेल. त्यासाठी त्यांना आपली विकेट टीकून खेळावे लागणार आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याचं करायचं काय? सराव सामन्यातही सपशेल अपयशी ठरला रिषभ; 17 चेंडू खेळून पण…
ना इंग्लंड, ना ऑस्ट्रेलिया; आयसीसीच्या मते भारत अन् पाकिस्तानचे ‘हे’ दोन खेळाडूच सर्वात भारी
किस्से क्रिकेटचे – ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या बाऊन्सरला उत्तर म्हणून ‘या’ भारतीय खेळाडूने चक्क मिशीच खेचली!