---Advertisement---

आयसीसीचा एक नियम, ज्याने बीसीसीआयला आले टेन्शन

On: शुक्रवार, मे 22, 2020 6:23 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे सध्या क्रिकेट क्षेत्र पूर्णपणे ठप्प पडले आहे. त्यामुळे भविष्यात क्रिकेटची सुरुवात झाल्यास होणाऱ्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) वेगवेगळ्या नियमांना लागू करण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे, यापुर्वी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटपेक्षा येत्या क्रिकेटचे स्वरुपात खूप बदल होतील.

या नियमावलीत आयसीसीने देशांतर्गत पंचांबाबतीतही असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे बीसीसीआयला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आयसीसी क्रिकेटची सुरुवात झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात देशांतर्गत पंचांची नियुक्ती करण्याचा विचार करत आहे. मात्र, या एका निर्णयामुळे भारताबरोबरच जगातील इतर देशांसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ICC New Rules For Umpires During International Matches Can Cause Huge Pain For BCCI.

जर आयसीसीने या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास भारतीय सामना अधिकाऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. या निर्णयाबाबत माजी आणि आताच्या क्रिकेट अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “क्रिकेटमध्ये जर हा नियम लागू करण्यात आला तर, कमी अनुभव असणाऱ्या पंचांमुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांवर विशेषत कसोटी सामन्यांवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो.”

आतापर्यंत आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये एकाही भारतीय पंचाचा समावेश नाही. २०१९मध्ये आयसीसीने एकमेव भारतीय पंच एस रवि यांना पॅनलमधून काढून टाकले होते. कसोटी सामन्यांसाठी आयसीसीच्या एलिट पॅनेलमधूनच पंचांची निवड केली जाते आणि सध्या पॅनेलमध्ये एकही भारतीय पंच उपलब्ध नसल्यामुळे, मायदेशातील सामन्यांसाठी बीसीसीआयला अनुभव नसलेल्या पंचांची निवड करावी लागले.

जर हा नियम लागू झाल्यास, आयसीसीने इंग्लंडच्या भारत दौऱ्यासाठी ४ पंचांची निवड केली आहे. यात केवळ नितिन मेनन यांच्याकडे कसोटीत पंच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी ३ कसोटी, २४ वनडे आणि १० टी२० सामन्यांत पंचाची भूमिका बजावली आहे. तर, उर्वरित सी शमसुद्दीन (४३ वनडे, २१ टी२०), अनिल चौधरी (२० वनडे, २० टी२०) आणि विरेंद्र शर्मा (२ वनडे, १ टी२०) यांच्याकडे एकाही कसोटी सामन्यात पंच म्हणून काम करण्याचा अनुभव नाही.

महत्त्वाचे म्हणजे, १९९४पासून ते २००१पर्यंत आंतरराष्ट्रीय सामन्यात १ स्थानिक आणि १ न्यूट्रल पंचाची नियुक्ती केली जात होती. मात्र, कोणत्याही सामन्यात २ न्यूट्रल पंच ठेवण्याचा नियम २००२मध्येच सुरु करण्यात आला होता.

आपल्या कारकिर्दीत २ कसोटी आणि ३४ वनडे सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्या माजी आंतरराष्ट्रीय पंच हरिहरन यांनी सांगितले की, “हा खूप मोठा संघर्ष आहे, पण त्याबरोबरच मोठी संधीही आहे. क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्वरुपात वेगवेगळा दबाव असतो. कसोटीत क्षेत्ररक्षक दबाव आणतात. तर, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रेक्षकांचा गोंधळ पंचावर दबाव निर्माण करतो. यासोबतच फक्त पंचाचे निर्णय नाही तर, आक्रमक अपिल आणि प्रकाश अशा गोष्टीदखील पंचांसाठी समस्या निर्माण करु शकतात. अशात न्यूट्रल पंच स्थानिक पंचापेक्षा निष्पक्ष निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते.”

“तर दुसरीकडे जिथे ज्या देशात एलिट पॅनलमध्ये सामना अधिकारी नाहीत. तिथे आंतरराष्ट्रीय पॅनेलच्या सामना अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. भारतात फक्त जवागल श्रीनाथ हे एलिट पॅनलचे सामना रेफरी आहेत. पण, आयसीसीचा हा नियम लागू करण्यात आल्यास अनिल चौधरी, शमसु्द्दीन आणि नितिन मेनन मायदेशातील कसोटी सामन्यात पंच म्हणून काम करु शकतात.”

आंतरराष्ट्रीय समितीच्या एका पंचाने म्हटले की, “फक्त मायदेशातील सामन्यात पंच म्हणून काम करणे खूप अवघड काम असते. पण त्यांना नक्की या अनुभवाचा फायदा होईल. जर, तुम्ही देशांतर्गत पंच आहात आणि तुमचा देशांतर्गत संघ प्रकाशाच्या समस्येमुळे खेळ थांबवण्याची मागणी करत असेल. तर त्यावेळी न्यूट्रल पंचाचा निर्णय अधिक महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच न्यूट्रल पंचांची नियक्ती केली जाते. मला आशा आहे की, हा नियम थोड्या काळासाठीच असेल. मात्र, तरीही पंचांना त्यांच्याच देशाच्या सामन्यात पंच म्हणून काम करताना खूप दबाव येतो.”

ट्रेंडिंग घडामोडी-

युवराज सिंगची इंस्टाग्राम स्टोरी पाहिलीय का? तुम्हालाही येईल हसू…

जगातील सर्वात महागडे अंपायर; पगाराच्या रक्कम ऐकून व्हाल अवाक्

वयाच्या चौथ्या वर्षी जागतिक विक्रम, प्रशिक्षकाचा खून आणि खेळाडूचा अस्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---