कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये इतर क्रिकेटपटूंप्रमाणे भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगदेखील सोशल मीडियावर वेळ घालवत आहे.
नुकत्याच ‘कीप इट अप’ चॅलेंजनंतर युवराजची एक इंस्टाग्राम स्टोरी सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. युवराजची ही स्टोरी म्हणजे चाहत्याने दिलेला एक सल्ला आहे. भारतीय फलंदाजांबद्दल चाहत्याने दिलेला एक सल्ला युवराजने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
युवराजच्या (Yuvraj Singh) या स्टोरीमध्ये चाहत्याने दिलेल्या सल्ल्यामध्ये भारतीय फलंदाजीच्या समस्येसाठी तीन पर्याय आहेत. ते तीन पर्याय खूपच मजेदार आहेत. ते असे की, “एक म्हणजे युवराजला फोन करा. दुसरा म्हणजे युवराजला व्हॉट्सऍप मेसेज करा आणि तिसरा म्हणजे युवराजचा ज्यूनियर येण्याची वाट पहा.”

युवराजने ही स्टोरी (Instagram Story) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत त्यामध्ये हसणाऱ्या ईमोजीचाही वापर केला आहे.
युवराजने भारतीय संघाकडून १७ वर्षे खेळल्यानंतर मागील वर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत ४० कसोटी सामने, ३०४ वनडे सामने आणि ५८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटी १९००, वनडेत ८७०१ आणि टी२०त ११७७ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हार्दिक पंड्या ‘या’ क्रमांकाची जर्सी घालून का खेळतो? ११ वर्षांनंतर उलगडले पंड्याचे गुपित
-‘एकेवळी फक्त सचिन एकटाच खेळायचा’ पहा या वाक्यात किती आहे तथ्य?
-आमच्या काळात यो-यो टेस्ट असती तर फक्त ‘हे’ दोन खेळाडूचं झाले असते पास






