आयसीसीने नुकतेच वनडे रँकिंग जाहीर केली आहे. मागील आठवड्यात आशिया चषक 2023 स्पर्धेतील सामन्यांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिका खेळली गेली. वनडे संघांच्या रँकिंगमध्ये बांगलादेश संघाकडून पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ अव्वलस्थान पटकावण्यापासून मुकला. तसेच, आफ्रिकेकडून सलग तीन पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी घसरली. आशिया चषकातील खराब प्रदर्शनानंतरही पाकिस्तान संघ अव्वलस्थानी कायम आहे.
सिराजची धमाल
याव्यतिरिक्त आयसीसी वनडे गोलंदाजी रँकिंगविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) चमकला. त्याने हैराण करणारी गरुडझेप घेतली. आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने श्रीलंका संघाविरुद्ध 6 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे 8 स्थानांच्या फायद्यासह तो थेट अव्वलस्थानी पोहोचला. याव्यतिरिक्त अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमानला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो चौथ्या स्थानी, तर राशिद खान तीन स्थानांच्या फायद्यासह पाचव्या स्थानी पोहोचला आहे. टॉप 10 खेळाडूंमध्ये भारताकडून कुलदीप यादव याला 2 स्थानांचे नुकसान झाले असून तो नवव्या स्थानी पोहोचला आहे.
Back to the 🔝
Congratulations to @mdsirajofficial on becoming the No.1️⃣ ranked bowler in ICC Men's ODI Bowler Rankings 👏👏#TeamIndia pic.twitter.com/ozlGmvG3U0
— BCCI (@BCCI) September 20, 2023
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज 10 स्थानांच्या फायद्यासह 15व्या स्थानी आहे. तसेच, इंग्लंडचा ख्रिस वोक्स 11व्या आणि पुन्हा आफ्रिकेचा लुंगी एन्गिडी हा 21व्या स्थानी आहे.
Top of the world 🔝
India's ace pacer reigns supreme atop the @MRFWorldwide ICC Men's ODI Bowler Rankings 😲
— ICC (@ICC) September 20, 2023
फलंदाजीत बाबर अव्वलस्थानी कायम
फलंदाजी रँकिंगमध्ये बाबर आझम (Babar Azam) पहिल्या, तर भारताचा शुबमन गिल (Shubman Gill) दुसऱ्या स्थानी कायम आहे. याव्यतिरिक्त भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) आठव्या आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 10व्या स्थानी आहेत. दक्षिण आफ्रिकेचा हेन्रीच क्लासेन 20 स्थानांच्या जबरदस्त फायद्यासह 9व्या स्थानी पोहोचला आहे.
टॉप 10मधून बाहेर इंग्लंडचा डेविड मलान कारकीर्दीतील सर्वोत्तम 13व्या स्थानी आहे. तसेच, वनडेत पुनरागमन करणारा बेन स्टोक्स 13 स्थानांच्या फायद्यासह 36व्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर 4 स्थानांच्या फायद्यासह 17व्या स्थानी आहे. श्रीलंकेचा चरिथ असलंका 2 स्थानांच्या फायद्यासह 28व्या, बांगलादेशचा शाकिब अल हसन 5 स्थानांच्या फायद्यासह 29व्या आणि ऑस्ट्रेलियाचा ऍलेक्स कॅरे 3 स्थानांच्या फायद्यासह 29व्या स्थानी आहे.
वनडे अष्टपैलू रँकिंगमध्ये शाकिब अल हसन पहिल्या स्थानी आहे. तसेच, भारताकडून पहिल्या 10 खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या सहाव्या स्थानी आहे. (icc odi ranking indian pacer mohammed siraj jumps top major changes asia cup 2023)
हेही वाचाच-
Dil Jashn Bole: World Cup 2023चे अँथेम साँग रिलीज; रणवीरची हवा, पण गाण्यात नाही एकही क्रिकेटर
वर्ल्डकप तोंडावर असतानाच श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ; दसून शनाका सोडणार कर्णधारपद!