१ जानेवारी २०१५ रोजी आयसीसी वनडे क्रमवारीत अनेक दिग्गज खेळाडू टाॅप १०मध्ये होते. त्यात भारताचे ३ तर दक्षिण आफ्रिकेच्या ३ खेळाडूंचा समावेश होता.
तेव्हा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या खेळाडूंमध्ये पहिल्या ते दहाव्या क्रमांकावर असे खेळाडू होते. एबी डिवीलिर्स (१), विराट कोहली(२), हशिम अमला(३), कुमार संगकारा(४), शिखर धवन(५), जाॅर्ज बेली(६), तिलकरत्ने दिलशान(७), क्विंटंन डिकाॅक(८), केन विलियमसन(९) व एमएस धोनी(१०) हे ते खेळाडू होते.
यातील एबी डिविलियर्स, हशिम अमला, कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान व जाॅर्ज बेली हे ५ खेळाडू आता क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. यात जाॅर्ज बेली तर ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीमध्ये आहे. एबी डिविलिर्स जगभरातील क्रिकेटच्या वेगवेगळ्या लीग खेळत असून कमबॅकसाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
एमएस धोनी हा जून २०१९मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून तो टी२० विश्वचषकात खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
राहिलेल्या ४ खेळाडूंमध्ये विराट सध्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी आहे तर शिखर धवन १७वा, क्विंटंन डिकाॅक १०वा तर केन विलियमसन ७व्या स्थानावर आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–वनडेत सर्वाधिक सरासरी राखलेले १० खेळाडू, विराट दुसरा तर धोनी…
-टॉप ५: सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळलेले खेळाडू !
-जगातील ह्या ५ खेळाडूंच्या आहेत विचित्र क्रमांकाच्या जर्सी