झिम्बाब्वेविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याचा मोठा फायदा टीम इंडियाला मिळाला आहे. संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला. ताज्या आयसीसी वनडे संघ क्रमवारीत संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. पण त्याचा रेटिंग पॉइंट वाढला आहे. भारताचे आता १११ गुण झाले आहेत.
पाकिस्तानने नेदरलँड्सचा ३-०ने पराभव केला आणि १०७ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर राहिले. म्हणजेच दोघांमध्ये फक्त ४ गुणांचा फरक आहे. न्यूझीलंड १२४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांनी वेस्ट इंडिजचा २-१ असा पराभव केला. दुसरीकडे इंग्लंडचा संघ ११९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता आयपीएल तेव्हाच खेळेल, जेव्हा…’; बेन स्टोक्सने केले महत्वाचे विधान
काय गोलंदाजी केलीस भावा? सगळेच फलंदाज शून्यावर बाद, १५ चेंडूत पालटला सामना