नुकतीच पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेत जबरदस्त प्रदर्शन करून पाकिस्तानने तिनही सामने जिंकले. पाकिस्तानने वेस्ट इंडीजला क्लीन स्पीप दिल्यानंतर भारतीय संघाला त्याचा फटका बसला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे.
एकदिवसीय क्रमावारीत भारतीय संघ यापूर्वी चौथ्या स्थानावर होता. पण तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप दिलेल्या पाकिस्तान संघाने आता भारताचे हे चौथे स्थान काबीज केले आहे. आता पाकिस्तान चौथ्या, तर भारतीय संघ मात्र पाचव्या स्थानावर घसरला आहे.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे, ज्यांची रँकिंग १२४ आहे. न्यूझीलंडनंतर १२४ रँकिंगसह इंग्लंड संघ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर १०७ रँकिंगसह ऑस्ट्रेलियन संघ कायम आहे. त्याच्या क्रमावारीत चौथ्या क्रमांकावर मात्र मोठा फेरबदल झाला. पाकिस्तान संघ १०६ रँकिंगसह चौथ्या, तर भारतीय संघ १०५ रँकिंगसह पाचव्या क्रमांकावर घसरला आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी पाकिस्तानची रँकिंग १०२ होती, पण मालिकेत संघाने जबरदस्त प्रदर्शन केले आणि क्रिमावारीत देखील सुधारणा केली. भारतीय संघाला पाकिस्तानमुळे फटका बसला असला, तरी पुढच्या महिन्यात भारताकडे क्रमावारीत पुन्हा आघाडी घेण्याची संधी आहे. पुढच्या महिन्यात भारत इंग्लंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध प्रत्येकी तीन-तीन सामन्यांच्या एकदविसीय मालिका खेळणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानला मात्र त्यांची पुढची एकदिवसीय मालिका ऑगस्ट महिन्यात नेदर्लंडविरुद्ध खेळायची आहे.
दरम्यान, पाकिस्तान संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मागच्या एक वर्षातील त्यांचे एकदिवसीय क्रिकेटमधील प्रदर्शन उल्लेखनीय आहे. पाकिस्तानने नोव्हेंबर २०२० मद्ये झिम्बाब्वे संघाला धूळ चारली होती. त्यानंतर २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाला त्यांच्या मायदेशात पराभूत केले होते. यांवर्षी मायदेशात खेळलेल्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिका देखील पाकिस्तानने जिंकल्या आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीचा एकंदरीत विचार केला, तर ६ व्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका संघ आहे. ७ व्या क्रमांकावर बांगलादेश आणि ८ व्या क्रमांकावर श्रीलंका आहे. वेस्ट इंडीज संघ ९ व्या क्रमांकावर आहे, तर आफगाणिस्तान संघ १० व्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvsSA T20: ‘या’ अष्टपैलू खेळाडूच्या जागी रवी बिश्नोईला खेळवा, भारताच्या माजी दिग्गजाचा सल्ला
भावड्याला आता तरी संघात खेळण्याची संधी द्या!, जहीर खानने केली ‘या’ खेळाडूला संघात घेण्याची मागणी
‘चहलची खराब कामगिरी भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण’, भारताचा माजी दिग्गज तापला