आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकून भारतीय संघाने 140 कोटी भारतीयांची मने जिंकली आहेत. भारताने श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत करत स्पर्धेचे 8व्यांदा विजेतेपद नावावर केले. या मोठ्या विजयानंतर भारताच्या रेटिंगमध्ये वाढ झाली, पण आयसीसी रँकिंगमध्ये भारत अजूनही दुसऱ्या स्थानी कायम आहे. रविवारी (दि. 17 सप्टेंबर) झालेल्या सामन्यानंतर यामध्ये एक बदल झाला. खरं तर, आशिया चषक स्पर्धेदरम्यान 1 क्रमांकाहून तिसऱ्या स्थानी पोहोचणारा पाकिस्तान आता पुन्हा अव्वलस्थानी पोहोचला आहे.
आशिया चषकात खराब प्रदर्शन, तरीही पाकिस्तान अव्वलस्थानी कशी?
आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतून लाजीरवाण्या पद्धतीने बाहेर होणाऱ्या बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाला कोणत्याही सामन्याशिवाय अव्वलस्थान मिळाले. यामागील कारण म्हणजे भारतीय संघाचा बांगलादेशविरुद्धचा पराभव होय. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेने वनडे मालिकेत 3-2ने पराभूत केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी घसरली. तसेच, भारत अंतिम सामन्यातील विजयानंतरही अव्वलस्थानी पोहोचू शकला नाही.
India and Australia both have a chance to regain the top spot in the @MRFWorldwide ICC Men’s ODI Team Rankings when they face-off later this week.
More ➡️ https://t.co/mIT7iCarHq pic.twitter.com/7GfIMJXvBZ
— ICC (@ICC) September 18, 2023
भारताकडे अजूनही अव्वल क्रमांक पटकावण्याची संधी
भारताकडे या आठवड्यात आयसीसी वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शुक्रवारी (दि. 22 सप्टेंबर) पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला पराभूत केले, तर भारत अव्वलस्थानी पोहोचेल. भारताचे 114.659 आणि पाकिस्तानचे 114.889 गुण आहेत. अशात काही पॉईंट्सने पाकिस्तान पुढे आहे. त्यामुळे भारताकडे पाकिस्तानला मागे सोडण्याची सुवर्णसंधी असेल.
पुढील महिन्यात विश्वचषक 2023
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 22 ते 27 दरम्यान 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहेत. या मालिकेनंतर भारताला वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत खेळायचे आहे. स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामनादेखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी आहे. अशात सर्वांच्या नजरा भारतीय संघाच्या कामगिरीवर लागल्या आहेत. (icc odi rankings why pakistan became no 1 team despite india winning asia cup 2023 know here)
महत्वाच्या बातम्या-
इशानने घेतला पंगा, मग विराटनेही दाखवला इंगा; Asia Cup Champion बनल्यानंतर स्टार खेळाडूंचा Video Viral
‘अरे! वर्ल्डकप जिंकल्यानंतर फोडा यार…’, रोहितने गाजवली पत्रकार परिषद; वाचा असं का म्हणाला ‘कॅप्टन’