जगातील सर्वात मोठे 1 लाख 32 हजार प्रेक्षक क्षमतेचे क्रिकेट स्टेडिअम असलेले नरेंद्र मोदी स्टेडिअम विश्वचषक 2023 अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषकाचा किताब जिंकण्यासाठी काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने माध्यमांशी संवाद साधला. त्याने यावेळी संघाच्या योजनांवरही भाष्य केले. मात्र, यादरम्यान रोहित शर्मा रागावला. त्याने काय प्रतिक्रिया दिली, चला जाणून घेऊयात…
रोहित शर्मा चिडला
झाले असे की, रोहित शर्मा (Rohit Sharma) जेव्हा आपले मत मांडत होता, त्याचवेळी एका पत्रकाराचा मोबाईल वाजला, ज्यावर भारतीय कर्णधार म्हणाला, “काय राव, फोन बंद करा.” असे म्हटल्यानंतर रोहित पुन्हा संवाद साधू लागला. रोहित म्हणाला की, “भावनात्मकरीत्या ही एक मोठी संधी आहे. निःसंशयपणे हे आमच्यासाठी सर्वात मोठे स्वप्न आहे, पण आम्हाला आमचा खेळ खेळावा लागेल. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. या स्थितीत शांत राहणे सर्वात गरजेचे आहे. ही एक मोठी संधी आहे.”
खरं तर, ऑस्ट्रेलिया संघ 8व्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत आहे. तसेच, भारतीय संघाचा हा चौथा अंतिम सामना असेल. रोहितसेनेचे स्पर्धेतील प्रदर्शन पाहायचे झाले, तर त्यांनी साखळी फेरी असो किंवा उपांत्य सामना, यामध्ये एकही सामना गमावला नाहीये. भारताने 10 पैकी 10 सामने जिंकले आहेत.
https://twitter.com/pacinolegacy_/status/1725895883953463421
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाने मागील सलग 8 सामने आपल्या नावावर केले आहेत. त्यांना स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यांना भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभूत व्हावे लागले होते.
अशात हे पाहावे लागेल की, विश्वचषक 2023 अंतिम सामन्याच्या (World Cup 2023 Final) दणदणीत विजय मिळवून लाखमोलाची ट्रॉफी कोणता संघ उंचावतो. खरं तर, भारतीय संघ मागील 10 वर्षांपासून आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकला नाहीये. त्यांच्याकडे 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. त्यांनी हा विश्वचषक जिंकला, तर भारताच्या नावावर 1983, 2011 आणि 2023 असे एकूण तीन किताब होतील. (icc odi world cup 2023 ind vs aus final indian captain rohit sharma gets angry in press conference read here)
हेही वाचा-
INDvsAUS Final Pitch Controversy: परत एकदा राडा! Ahmedabad पीचवरून पेटला वाद; दिग्गज म्हणाला, ‘दूर राहा…’
CWC 2023: ‘फक्त या माणसासाठी विश्वचषक जिंकायचाय’, कर्णधार रोहितने थेट नावच सांगून टाकलं