---Advertisement---

आर अश्विनसह ‘या’ खेळाडूंना फेब्रुवारी महिन्यातील ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन

On: मंगळवार, मार्च 2, 2021 4:58 PM
---Advertisement---

जानेवारी २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार आता फेब्रुवारी महिन्यातील या पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेपटूच्या पुरस्कारासाठी पुरुष गटात भारताचा फिरकीपटू आर अश्विन, इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुट आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू काईल मायर्स यांना नामांकन मिळाले आहे. तर महिला गटात इंग्लंडच्या टॅमी ब्यूमॉन्ट,  नॅट सायव्हर यांना आणि न्यूझीलंडच्या ब्रूक हॅलिडे हिला नामांकन मिळाले आहे.

अशी आहे नामांकित खेळाडूंची कामगिरी 

आर अश्विनने फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध ३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने १७६ धावा केल्या असून २४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत १०६ धावांची शतकी खेळी केली होती.

त्याचबरोबर जो रुटने भारताविरुद्ध ३ कसोटी सामने फेब्रुवारी महिन्यात खेळताना ३३३ धावा केल्या असून ६ विकेट्स घेतल्या आहेत. यातील अहमदाबादला झालेल्या तिसऱ्या कसोटीत रुटने एका डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच चेन्नईला झालेल्या पहिल्या कसोटीत त्याने २१८ धावांची खेळी केली होती.

मायर्सने फेब्रुवारीमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण करताना २ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच नाबाद २१० धावांची विक्रमी खेळी करताना वेस्ट इंडिजला ३९५ धावांचे मोठे आव्हान पार करुन देत विजय मिळवून दिला होता. तसेच त्याने या २ सामन्यात मिळू २६१ धावा केल्या होत्या.

https://twitter.com/ICC/status/1366677547195400192

महिलांमध्ये नामांकन मिळालेल्या ब्यूमॉन्ट आणि नॅट सायव्हरने फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३ वनडे सामने खेळले आहेत. त्यात ब्यूमॉन्टने २३१ धावा करताना प्रत्येक सामन्यात अर्धशतके केली आहेत. तसेच नॅट सायव्हरने ५ विकेट्स घेतल्या असून ९६ धावा केल्या आहेत. यात तिच्या ६३ धावांच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच ब्रुकने इंग्लंडविरुद्ध फेब्रुवारीमध्ये वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तिने ३ वनडे सामन्यात ११० धावा केल्या असून २ विकेट्स घेतल्या आहेत.

https://twitter.com/ICC/status/1366680077870587905

जानेवारीत रिषभ पंत, शबनम इस्माईल जानेवारी महिन्यातील विजेते

जानेवारी महिन्याचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला आणि सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या शबनम इस्माईलला मिळाला होता.

अशा पद्धतीने दिले जातात पुरस्कार 

या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येते. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येते.

आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतात.

व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करते. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतात. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना 90 टक्के तर चाहत्यांच्या मतांना 10 टक्के प्राधान्य असते. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्‍या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या –

अंडर १९ वर्ल्डकपचे ‘हे’ ५ हिरो टीम इंडियाकडून एखादा सामना खेळण्याची पाहताय वाट

विराटबरोबर २००८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळलेले खेळाडू सध्या काय करतात, वाचा

रवी शास्त्रींनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, ट्विट करत म्हटले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---