भारतीय महिला संघ (Indian Women’s cricket Team) सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. न्यूझीलंडमध्ये ४ मार्चपासून आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२ (ICC Women’s World Cup 2022) खेळला जाणार आहे. भारत आणि त्याचा कट्टर विरोधी संघ पाकिस्तान एकमेकांविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक अभियानाची सुरुवात करणार आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयसीसीने भारतीय महिला संघाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत भारतीय महिला क्रिकेटपटू आनंदात दिसत आहेत.
विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय महिला संघाचा प्री-टूर्नामेंट फोटोशूट झाला. हा व्हिडिओ त्याच फोटोशूटमधील आहे, जेव्हा संघातील सर्वा खेळाडू मजामस्त करताना दिसत आहेत. व्हिडिओत भारतीय संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर भांगडा करताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवातच हरमनप्रीतच्या भांगड्यानेच होते.
त्यानंतर हरमनप्रीत म्हणते की, “मला फक्त हेच (भांगडा) करता येते. मी जिथे कुठे जाते, हेच करत असते.” आयसीसीने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “चांगल्या डान्ससोबत हास्याचा खुराक. भारतीय कॅम्पमध्ये आनंदी वातावरण आहे.”
या व्हिडिओत यस्तिका भाटिया देखील डान्स करतना दिसत आहे. भारतीय संघाच्या सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना आणि शेफाली वर्मा मनमोकळेपणाने हसताना दिसत आहेत. व्हिडिओत त्याव्यतिरिक्त अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी, मिताली राज, ऋचा घोष, तसेच इतरही खेळाडू दिसत आहेत. भारतीय चाहत्यांना आयसीसीने शेअर केकेला हा व्हिडिओ आवडला आहे. चाहते व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाइक्स देत आहेत.
https://www.instagram.com/p/Caj8WsKlSqy/
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना चार मार्चला खेळला जाणार आहे, जो न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळला जाईल. भारतीय संघाच्या अभियानाची सुरुवात ६ मार्चपासून होईल. भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध त्यांचा पहिला सामना खेळणार आहेत. त्यानंतर भारताला दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे, जो १० मार्चला होईल. १२ मार्चला तिसरा सामना वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला जाईल. त्यानंतर १६ मार्चला इंग्लंड, १९ मार्चला ऑस्ट्रेलिया, २२ मार्चला बांगलादेश आणि २७ मार्चला दक्षिण अफ्रिका संघाचे भारतासमोर आव्हान असेल.
महत्वाच्या बातम्या –
तो खूप बदलला! विराटच्या ‘शंभरी’आधी U19 विश्वचषक संघातील सहकाऱ्यांनी जागवल्या आठवणी
IPL 2022: ‘या’ तारखेपासून संघ सुरू करू शकतात सराव, महाराष्ट्र सरकारची ५ जागांसाठी मंजूरी