---Advertisement---

सलमान अली आगाला आयसीसीचा मोठा दणका; मैदानावरील ‘त्या’ कृत्यामुळे मिळाली कडक शिक्षा!

On: शनिवार, मार्च 14, 2026 6:04 PM
---Advertisement---

सध्या पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर असून, ढाका येथील दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने 128 धावांनी विजय मिळवला. मात्र, या विजयापेक्षा चर्चा रंगली ती सलमान अली आगाच्या (Salman Ali Agha) एका चुकीच्या कृत्याची आणि त्यानंतर त्याला मिळालेल्या शिक्षेची.

फलंदाजी करत असताना सलमान अली आगा दुर्दैवीरीत्या रन आऊट झाला. बांगलादेशी कर्णधार मेहदी हसन मिराजच्या षटकामध्ये मोहम्मद रिझवानने एक शॉट खेळला. चेंडू खेळपट्टीवरच थांबला होता. यावेळी सलमान क्रीझच्या बाहेर होता. तो स्वतःला सुरक्षित करण्याऐवजी मेहदी हसनला चेंडू देण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याआधीच मेहदीने चेंडू उचलून स्टंपला मारला आणि सलमान आऊट झाला.

थर्ड अंपायरने आऊट दिल्यावर सलमानला आपला राग अनावर झाला. त्याने मैदानावरच आपले हेल्मेट आणि ग्लोव्हज (हातमोजे) जमिनीवर जोरात आदळले. पॅव्हेलियनमध्ये परततानाही त्याने पुन्हा तेच कृत्य केले. त्याच्या या वागण्यामुळे ICC ने त्याच्यावर कडक ताशेरे ओढले आहेत.

क्रिकेटमधील साहित्य किंवा उपकरणांचा गैरवापर केल्याबद्दल त्याला दोषी धरण्यात आले आहे. मॅच रेफरी नियामुर राशिद यांनी सलमानला अधिकृतपणे ‘फटकार’ (Reprimand) लगावली आहे. त्याच्या शिस्तभंगाच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जोडण्यात आला आहे. रेफरींनी स्पष्ट केले की, सलमानचा असा कोणताही जुना रेकॉर्ड नसल्यामुळे सध्या त्याला फक्त तंबी आणि पॉईंट देऊन सोडण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---