---Advertisement---

टी२० विश्वचषक व्हावं की नाही? ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणतात…

---Advertisement---

येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या आयोजनावर कोरोना व्हायरसमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. असे असले तरीही एकीकडे आयसीसी या स्पर्धेचे आयोजन करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसते.

दुसरीकडे मात्र यजमान ऑस्ट्रेलिया संघाचे अधिकारी आणि खेळाडूंच्या चर्चेमुळे असे वाटत आहे की, त्यांना ही स्पर्धा खेळायचीच नाही.

आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने एका मुलाखतीत सांगितले की, टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्याची योजना सुरु आहे. तसेच याबद्दल इतर कोणतीही नवीन माहिती नाही.

ऑस्ट्रेलिया संघाचे अनेक दिग्गज खेळाडू टी२० विश्वचषकाच्या (T20 World Cup) आयोजनाबाबतीत उत्साही दिसत नाहीत. ते सतत एकाच गोष्टीची चर्चा करत आहेत की ही स्पर्धा स्थगित करावी लागू शकते.

सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) रोहित शर्माबरोबर झालेल्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये म्हटले होते की, “सध्याच्या परिस्थितीत आयसीसी टी२० विश्वचषकाचे आयोजन होणार असल्याचे दिसत नाही. एकूण १६ संघाना एकत्र आणणे कठीण असेल.”

वॉर्नरव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचनेही (Aaron Finch) म्हटले होते की, तो टी२० विश्वचषक स्थगित होण्यासाठी मानसिकरित्या तयार आहे. सेन रेडिओशी बोलताना तो म्हणाला की, “मला वाटते की आम्हाला मानसिकरित्या तयार झाले पाहिजे की टी२० विश्वचषक २-३महिन्यांसाठी स्थगित केले जाऊ शकते.”

तसेच ख्रिस लिन (Chris Lynn) आणि ऍलेक्स कॅरीनेही (Alex Carey) या विश्वचषकाच्या आयोजनावर आपले मत व्यक्त केले होते. लिन म्हणाला होता की, जर सर्व संघ ऑस्ट्रेलियामध्ये आले तर परिस्थिती खराब होऊ शकते. तर कॅरी म्हणाला होता की, सर्व संघ जरी ऑस्ट्रेलियात आले तर मोकळ्या स्टेडिअममध्ये टी२० विश्वचषक खेळण्यात काहीच मजा येणार नाही.

ट्रेंडिंग घडामोडी-

-१ रुपयांत ३० वर्षांपासून इडली विकणाऱ्या ८५ वर्षीय महिलेचा भारतीय क्रिकेटपटूकडून सन्मान

-जर आयपीएल रद्द झाली तर एवढ्या मोठ्या रकमेवर सोडावे लागणार पाणी

-धोनीची आई म्हणते, माझा मुलगा एवढाही वयस्कर नाही झाला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---