आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) (Icc) दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. तसेच प्रत्येक स्वरूपाची प्लेइंग ईलेव्हेन देखील जाहीर करण्यात येत असते. नुकताच आयसीसीने २०२१ वर्षातील सर्वोत्कृष्ट टी२० संघाची (Icc T20 team of the year) घोषणा केली आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशा पडली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या सर्वोत्कृष्ट टी२० संघाचे कर्णधारपद बाबर आजमच्या (Babar Azam) हाती सोपवण्यात आले आहे. तर भारतीय संघातील एकाही खेळाडूला या संघात स्थान देण्यात आले नाहीये. या प्लेइंग ईलेव्हेनमध्ये पाकिस्तान संघातील ३ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये बाबर आजम ( कर्णधार), मोहम्मद रिजवान (Mohammad Rezwan) (यष्टिरक्षक) आणि शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) (वेगवान गोलंदाज) यांचा समावेश आहे.
पाकिस्तान संघातील या तिन्ही खेळाडूंनी २०२१ मध्ये अप्रतिम कामगिरी केली. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत आझम आणि रिजवान या दोन्ही फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. याच कामगिरीमुळे पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली होती.
तसेच विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघातून मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि जोश हेजलवूड या दोन्ही खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच इंग्लंड संघाचा जोस बटलर (Jos Buttler) हा एकमेव खेळाडू आहे, ज्याची या संघात निवड करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाच्या एडेन मार्करम, डेविड मिलर, तबरेज शम्सी या तीन खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच बांगलादेश संघाच्या मुस्तफिजुर रहमान, श्रीलंका संघाचा वानिंदू हसरंगाची या संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली होती. हेच कारण असावे की, एकही भारतीय खेळाडूला या संघात स्थान देण्यात आले नाहीये.
The ICC Men's T20I Team of the Year certainly packs a punch 👊
More 👉 https://t.co/TtQKyBL3rw pic.twitter.com/mhfNsE2mU3
— ICC (@ICC) January 19, 2022
वर्ष २०२१ साठी आयसीसीने निवडलेली सर्वोत्कृष्ट प्लेइंग ११ (Icc T20 team of the year 2021)
जोस बटलर, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), बाबर आझम, एडन मार्करम, मिचेल मार्श, डेविड मिलर, तबरेज शम्सी, जोश हेझलवूड, वानिंदू हसरंगा, मुस्तफिजुर रहमान, शाहीन आफ्रिदी.
महत्वाच्या बातम्या :
कॅरिबियन खेळाडूंची बातच काही और! फलंदाजाला बाद केल्यानंतरचे ‘बुलेट’ सेलिब्रेशन व्हायरल
हे नक्की पाहा: