यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 39वा सामना आज (17 जून) रोजी न्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी (NZ vs PNG) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. ब्रायन लारा या स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 8 शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आश्चर्यकारक म्हणजे न्यूझीलंड सारख्या संघाच्या हाती निराशा लागली आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
न्यूझीलंड- फिन एलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोढी, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
पापुआ न्यू गिनी- टोनी उरा, असद वाला(कर्णधार), चार्ल्स अमिनी, सेसा बाऊ, हिरी हिरी, चाड सोपर, किपलिन डोरिगा(यष्टीरक्षक), नॉर्मन वानुआ, अले नाओ, काबुआ मोरिया, सेमो कामिया
न्यूझीलंडनं यंदाच्या टी20 विश्वचषकात साखळीफेरीतील 3 सामने खेळले आहेत. पापुआ न्यू गिनी संघासोबत आज त्यांचा शेवटचा सामना आहे. त्यांनी पहिला सामना अफगाणिस्तान संघासोबत खेळला. यामध्ये अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा 84 धावांनी दारुण पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं त्यांना 13 धावांनी धूळ चारली आणि तिसऱ्या सामन्यात युगांडा संघाचा पराभव करुन यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिला विजय मिळवला.
पापुआ न्यू गिनी संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकात 3 सामने खेळले आहेत. परंतु तीनही सामन्यात त्यांच्या हाती केवळ निराशाच लागली आहे. वेस्ट इंडिज, युगांडा, अफगाणिस्तान या संघांनी पापुआ न्यू गिनी संघाला विजयाचं खात उघडू दिलं नाही. पीएनजी संघ साखळीफेरीतील शेवटच्या सामन्यासाठी आज न्यूझीलंडचा सामना करणार आहे.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात प्रथमच भिडत आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन्ही संघ कधीही आमनेसामने आले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?
भारतासाठी ‘या’ 3 दिग्गज खेळाडूंचा असणार शेवटचा टी20 विश्वचषक?
सुपर-8 सामन्यांपूर्वी विराट कोहलीचा कूल अंदाज, रिंकू-जयसवालही संघात दाखल, व्हिडिओ व्हायरल