यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) गुरुवार (20 जून) रोजी सुपर 8 मधील तिसरा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना बार्बाडोसच्या स्टेडियमवर रंगणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान दोन्ही संघांचा सुपर 8 मधील पहिलाच सामना आहे. तत्पूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारताच्या प्लेइंग 11 बद्दल माहिती दिली आहे.
राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणाले, “कोणत्याही खेळाडूला संघाबाहेर ठेवणं खूप अवघड अहे, परंतु परिस्थिती लक्षात घेऊन आम्हाला संघ बनवावा लागतो. वेस्ट इंडिजमध्ये खेळपट्टी वेगळी असू शकते, त्यानुसार भारतीय संघाचं काॅम्बिनेशन ठरवणार आहे. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) किंवा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दोघांपैकी एका खेळाडूला संघात सामील केले जाईल.”
पुढे बोलताना राहुल द्रविड म्हणाले, “आम्ही भाग्यवान आहे की, आमच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत, आमच्याकडे 8 फलंदाज होते, पण आमच्याकडे गोलंदाजीचे 7 पर्यायही होते. आम्ही आमच्या फलंदाजीच्या क्रमात परिस्थितीनुसार बदल करु. आम्ही काही दिवस चांगला सराव केला आणि आता आम्ही तयार आहोत. अफगाणिस्तानचे खेळाडू धोकादायक आहेत. त्यांचे खेळाडू जगभरातील टी20 लीगमध्ये खेळतात. आयपीएलचे प्रमुख खेळाडू अफगाणिस्तान संघात आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याबाबत कोणत्याही वेगळ्या योजना बनवणार नाही.”
यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतानं चमकदार कामगिरी केली आहे. 4 साखळी सामन्यात त्यांनी 3 सामन्यात विजय मिळवला तर 1 सामना पावसानं खोळंबा घातल्यामुळे रद्द करण्यात आला. अफगाणिस्तान संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकात दमदार कामगिरी केली त्यांनी 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला. एका सामन्यात त्यांचा वेस्ट इंडिजनं धुव्वा उडवला.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर टी20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन्ही संघ 3 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये भारतानं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. अफगाणिस्तान संघ भारतापुढे विजय मिळवू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
हे 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील; सुपर-8 फेरी दरम्यान डेल स्टेनची आश्चर्यकारक भाविष्यवाणी समोर
सुपर-8 फेरीपूर्वी दोन्ही संघांना धोक्याची घंटा! भारत-अफगाणिस्तान सामन्यावर पावसाचे सावट?
कसोटी क्रिकेटमध्ये आधिराज्य गाजवणाऱ्या किंग कोहलीनं आजच्या दिवशी केलं होतं पदार्पण!