---Advertisement---

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप: सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१० खेळाडू

---Advertisement---

आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपची सुरुवात १ ऑगस्ट २०१९ ला ऍशेज सीरीजसोबत झाली आहे. जून २०२१ पर्यंत चालणाऱ्या या चॅम्पियनशीपमध्ये एकूण ९ संघ सहभागी होणार आहेत. शेवटी टॉप-२ संघांमध्ये इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्यात येईल.

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना ६-६ मालिका खेळाव्या लागणार आहेत. प्रत्येक सीरीजमध्ये विजयी संघाला १२० गुण मिळतील. भारतीय संघाचे आतापर्यंतचे कसोटी चॅम्पियनशीपमधील प्रदर्शन दमदार राहिले आहे. भारतीय संघ ३६० गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे.

या लेखात, कसोटी चॅम्पियनशीपमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-१० खेळाडूंविषयी माहिती देण्यात आली आहे. ICC Test Championship List Of Top-10 Batsman And Bowlers

सर्वाधिक धावा करणारे टॉप-१० फलंदाज –

१. मार्नस लॅब्यूशाने (ऑस्ट्रेलिया) : सामने- ९, धावा- १२४९, सरासरी- ८३.२६, शतके- ४

२. बेन स्टोक्स (इंग्लंड) : सामने- १३, धावा- ११३१, सरासरी- ५३.८५, शतके- ४

३. स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) : सामने- ९, धावा- १०२८, सरासरी- ७३.४२, शतके- ३

४. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) : सामने- १०, धावा- ८८१, सरासरी- ५५.०६, शतके- ३

५. जो रुट (इंग्लंड) : सामने- १३, धावा- ८३७, सरासरी- ३४.०४, शतके- ०

६. मयंक अगरवाल (भारत) : सामने- ९, धावा- ७७९, सरासरी- ५५.६४, शतके- ३

७. बाबर आझम (पाकिस्तान) : सामने- ७, धावा- ७३६, सरासरी- ८१.७७, शतके- ४

८. रॉरी बर्न्स (इंग्लंड) : सामने- ११, धावा- ७३१, सरासरी- ३६.५५, शतके- १

९. अजिंक्य रहाणे (भारत) : सामने- ९, धावा- ७१५, सरासरी- ५९.५८, शतके- २

१०. विराट कोहली (भारत) : सामने- ९, धावा- ६२७, सरासरी- ५२.२५, शतके- २

सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१० गोलंदाज –

१. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) : सामने- १३, विकेट्स- ६३, सरासरी- १९.१५, ५ विकेट हॉल- २

२. पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) : सामने- १०, विकेट्स- ४९, सरासरी- २१.४४, ५ विकेट हॉल- १

३. नाथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) : सामने- १०, विकेट्स- ४७, सरासरी- २६.८२, ५ विकेट हॉल- ४

४. मोहम्मद शमी (भारत) : सामने- ९, विकेट्स- ३६, सरासरी- १८.६३, ५ विकेट हॉल- १

५. जोफ्रा आर्चर (इंग्लंड) : सामने- ८, विकेट्स- ३६, सरासरी- २५.०२, ५ विकेट हॉल- ३

६. टीम साउथी (न्यूझीलंड) : सामने- ६, विकेट्स- ३३, सरासरी- १८.८१, ५ विकेट हॉल- २

७. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) : सामने- ६, विकेट्स- ३३, सरासरी- १९.१५, ५ विकेट हॉल- २

८. जोश हेजलवुड (ऑस्ट्रेलिया) : सामने- ७, विकेट्स- ३१, सरासरी- २१.१९, ५ विकेट हॉल- १

९. इशांत शर्मा (भारत) : सामने- ७, विकेट्स- ३०, सरासरी- १५.५०, ५ विकेट हॉल- ३

१०. क्रिस वोक्स (इंग्लंड) : सामने- ९, विकेट्स- २९, सरासरी- २४.४१, ५ विकेट हॉल- १

ट्रेंडिंग लेख –

‘या’ ३ बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं सुरेश रैनाचे अफेयर, अनुष्कासोबतही होती चर्चा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---