सोमवारी (16 डिसेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) नव्या कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या स्थानावर कायम असून दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहची मात्र सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथपेक्षा (Steve Smith) कोहली (928) 17 गुणांनी पुढे आहे. पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात 12 ते 15 डिसेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीमध्ये स्मिथने 43 आणि 16 धावा केल्या होत्या.
तसेच भारताचे फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) (791) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) (759) अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.
ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅब्युशाने (Marnus Labuschagne) क्रमवारीत प्रगती केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात 143 आणि 50 धावांची शानदार खेळी करणारा लॅब्यूशाने तीन स्थानांच्या सुधारणेसह 5 व्या क्रमांकावर आला आहे.
नव्या क्रमवारीत त्याने सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला(David Warner) मागे टाकले आणि स्मिथनंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज बनला आहे.
https://twitter.com/ICC/status/1206485622392795138
तसेच श्रीलंकेबरोबरच्या मायदेशातील पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद 102 धावा केल्यानंतर बाबर आझम (Babar Azam) पहिल्यांदा पहिल्या दहा फलंदाजांमध्ये पोहोचला आहे.
टी20 (T20 Ranking) क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला आणि वनडे (ODI) क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला आझम फलंदाज कसोटी क्रमवारीत 11 व्या स्थानावरुन नवव्या क्रमांकावर आला आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) मायदेशातील मालिकेपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (Pat Cummins) प्रथम क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सात बळी घेणारा न्यूझीलंडचा नील वॅगनर (Neil Wagner) पुन्हा एकदा कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
तसेच या सामन्यात नऊ गडी बाद करणारा न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साउथीही पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
या कसोटी सामन्यात 9 बळी घेणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिशेल स्टार्क (Mitchell starc) कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 806 गुणांसह 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
https://twitter.com/ICC/status/1206488391229022208
जाॅश हेझलवुड (Josh Hazlewood) देखील 8 व्या क्रमांकावरुन 7 व्या स्थानावर गेला आहे. अष्टपैलू क्रमवारीत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अव्वल क्रमांकावर असणाऱ्या वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरनंतर (Jason Holder) दुसर्या क्रमांकावर आहे.






