बुधवारी (दि. 22 फेब्रुवारी) आयसीसीकडून नवीन कसोटी रँकिंग जारी करण्यात आली आहे. सध्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. यामध्ये सर्व संघ कसोटी खेळण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आयसीसी रँकिंगवर आहेत. यावेळी क्रमवारीमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. तसेच, भारतीय संघासोबतच संघातील दमदार खेळाडूंनाही फायदा झाला आहे.
टी20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चमकला आहे, तो अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. तसेच, वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam) अव्वलस्थानी आहे. दुसरीकडे, वनडेत गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हादेखील अव्वलस्थानी आहे. अशातच कसोटी क्रमवारीत (Test Rankings) भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने अव्वलस्थान पटकावले आहे. यापूर्वीही जडेजा याच क्रमांकावर होता, परंतु त्याने यावेळी त्याचा विक्रम मोडला आहे.
रवींद्र जडेजा कसोटीतील अव्वल अष्टपैलू
आयसीसी कसोटी रँकिंग (ICC Test Rankings) यादीमध्ये भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. मागील आठवड्यातच क्रमवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये जडेजाला 424 गुण होते. मात्र, यावेळी त्याने कमाल प्रदर्शन करत 460 गुण मिळवत आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी जडेजाचे सार्वकालीन गुण हे 438 होते, जे त्याने 2017मध्ये मिळवले होते. यावेळी तो याच्या खूपच पुढे गेला आहे. आता त्याचे सार्वकालीन गुण हे 460 इतके झाले आहेत. याबाबतीत त्याच्या आसपासही इतर खेळाडू नाहीयेत.
कसोटीच्या अष्टपैलू यादीत दुसऱ्या स्थानी आर अश्विन आहे. त्याचे गुण 376 इतके आहेत. याव्यतिरिक्त शाकिब अल हसन हा तिसऱ्या स्थानी आहे. त्याचे 329 गुण आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसऱ्या कसोटीत जडेजाने पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 7 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. यामुळे जडेजाने गुणांमध्ये भरारी घेतली.
🚨 We have a new World No.1 🚨
Pat Cummins is displaced atop the @MRFWorldwide ICC Men's Test Bowlers' Rankings 😮
Details 👇
— ICC (@ICC) February 22, 2023
पॅट कमिन्सकडून हिसकावले अव्वलस्थान, अँडरसन कसोटीचा अव्वल गोलंदाज
दुसरीकडे, कसोटी फलंदाजीच्या अव्वलस्थानाबद्दल बोलायचं झालं, तर मार्नस लॅब्युशेन हा पहिल्या स्थानी आहे. त्याचे गुण 912 आहेत. असे असले, तरीही तो पहिल्या दोन सामन्यात खास चमकला नव्हता. मात्र, तरीही त्याची जागा पहिल्या स्थानी कायम आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी स्टीव्ह स्मिथ आहे. तसेच, तिसऱ्या स्थानी बाबर आजम आहे. म्हणजेच, इथेही कोणताच बदल पाहायला मिळाला नाही. फक्त एक बदल असा झाला आहे की, कसोटी गोलंदाजी क्रमवारीत जेम्स अँडरसन (James Anderson) याने पहिले स्थान पटकावले आहे. आतापर्यंत या जागी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स होता. मात्र, तो थेट तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तसेच, अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. त्याला एका स्थानाचा फायदा झाला होता. तसेच, जडेजाची पहिल्या 10मध्ये एन्ट्री झाली आहे. तो नवव्या स्थानी आहे. (ICC Test Rankings Ravindra Jadeja created a new record read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वयाच्या 40व्या वर्षी जेम्स अँडरसनची कमाल, पुन्हा बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज
चक्रीवादळामुळे न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचा संसार रस्त्यावर, पाणावलेल्या डोळ्यांसह सांगितल्या वेदना